जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : रिंकू सिंहने इंस्टाग्राम लाईव्हवर केली विराट कोहलीची मिमिक्री, Video पाहून आवरणार नाही हसू

IPL 2023 : रिंकू सिंहने इंस्टाग्राम लाईव्हवर केली विराट कोहलीची मिमिक्री, Video पाहून आवरणार नाही हसू

रिंकू सिंहने इंस्टाग्राम लाईव्हवर केली विराट कोहलीची मिमिक्री, Video पाहून आवरणार नाही हसू

रिंकू सिंहने इंस्टाग्राम लाईव्हवर केली विराट कोहलीची मिमिक्री, Video पाहून आवरणार नाही हसू

रिंकू सिंहने नुकतेच शुभमन गिल सोबत केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये विराट कोहलीची मिमिक्री केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात केकेआरचा फलंदाज रिंकू सिंहने 5 बॉलवर 5 सिक्स मारून संघाला विजय मिळवून दिला होता. त्या दिवसापासून रिंकू सिंहची आयपीएल 2023 मध्ये बरीच चर्चा सुरु आहे. रिंकू सिंहने नुकतेच शुभमन गिल सोबत केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये विराट कोहलीची मिमिक्री केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलचा 16 वा सीजन सुरु असताना काही दिवसांपूर्वी गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि केकेआर संघाचा फलंदाज रिंकू सिंह यांच्यात इंस्टाग्राम लाईव्ह पारपडले. या लाईव्हमध्ये दोघे देखील मजा मस्करी करत आयपीएल आणि क्रिकेट विषयी संवाद साधत होते. या दरम्यान शुभमन आणि चाहत्यांच्या फर्माईशने रिंकू सिंहने विराट कोहलीची मिमिक्री करण्याचा प्रयन्त केला.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

इन्स्टाग्रामवर लाइव्ह दरम्यान रिंकू सिंगने विराट कोहलीची स्टाइल कॉपी करण्याचा प्रयत्न केला. रिंकूने विराट कोहलीच्या हावभाव आणि फलंदाजीच्या स्टाईलची नक्कल केली. रिंकूने केलेली मिमिक्री पाहून शुभमन गिलला हसू आवरले नाही.  या लाईव्ह चॅट दरम्यान 51 हजार हुन अधिक प्रेक्षक रिंकूची मिमिक्री पाहात होते. प्रेक्षकांनी यावर अनेक मजेदार कमेंट्स केल्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात