मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 RCB vs MI : आरसीबीचे तीन खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर, मुंबईला राहवं लागणार सावध!

IPL 2023 RCB vs MI : आरसीबीचे तीन खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर, मुंबईला राहवं लागणार सावध!

आरसीबीचे तीन खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर, मुंबईला राहवं लागणार सावध!

आरसीबीचे तीन खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर, मुंबईला राहवं लागणार सावध!

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अशातच आरसीबीचे 3 खेळाडू आयपीएलमध्ये विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर असून मुंबई इंडियन्सला यांच्यापासून सावध रहावे लागणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 एप्रिल : जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. आज आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार असून याकरता क्रीडा प्रेमी उत्सुक आहेत. अशातच आरसीबीचे 3 खेळाडू आयपीएलमध्ये विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर असून मुंबई इंडियन्सला यांच्यापासून सावध रहावे लागणार आहे.

बंगळुरुच्या एम चिन्नस्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आयपीएल 2023 चा पाचवा सामना खेळवला जाणार आहे. तब्बल 2 वर्षांनी आरसीबी आपल्या होम ग्राउंडवर आयपीएलचा सामना खेळत असून याकरता प्रेक्षक बरेच उत्साहित आहेत. आजच्या सामन्यात मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल हे आरसीबी संघाचे तीन स्टार खेळाडू आयपीएलमध्ये मोठे विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

IPL 2023 : मराठी खेळाडूच्या नादाला गेला अन् परदेशी खेळाडू IPL मधूनच बाहेर पडला

आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला आयपीएलमध्ये 200 चौकारांचा आकडा पूर्ण करण्यासाठी आजच्या सामन्यात केवळ 4 चौकार लगावण्याची आवश्यकता असेल. याच सोबत हर्षल पटेल हा आयपीएलमध्ये १०० विकेट्सचा आकडा पूर्ण करण्यापासून केवळ ३ विकेट्स दूर आहे.  तर गोलंदाज मोहम्मद सिराजला आजच्या सामन्यात केवळ 1 विकेट घेण्यात यश आल्यास त्याची आयपीएलमध्ये आरसीबीसाठी घेतलेली 50 वी विकेट ठरेल.

आयपीएल 2023 च्या पाचव्या सामन्यात आयपीएलमधील दोन्हीही तगड्या टीम आमनेसामने येणार आहेत. तेव्हा दोघांपैकी कोणता संघ या सामन्यात बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, RCB, Rohit Sharma, Virat Kohli