मुंबई, 2 एप्रिल : आयपीएलला सुरुवात होताच गत विजेत्या गुजरात टायटन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सचा महत्वाचा खेळाडू केन विल्यमसन आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या सामन्यात केन विल्यमसनला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरला नसल्याने त्याच्यावर आयपीएल मधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा पहिला सामना पारपडला. या सामन्यात चेन्नईकडून मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा मैदानावर चौकार शटकारांची आतिषबाजी करत होता. याच दरम्यान ऋतुराजच्या बॅटमधून एक कडक शॉत निघाला. हा शॉट मारताच चेंडू सीमारेषे बाहेर जात होता. तितक्यात गुजरातचा खेळाडू केन विल्यमसन याने हा षटकार रोखण्यासाठी धाव घेतली. परंतु यावेळी चेंडू पकडण्याच्या नादात तो जमिनीवर जोरात आदळला. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत एकवढी मोठी होती की बराचवेळ केन विल्यमसन मैदानावर वेदनेने कळवळत होता. मैदानावरून बाहेर जाताना देखील तो लंगडत होता.
We regret to announce, Kane Williamson has been ruled out of the TATA IPL 2023, after sustaining an injury in the season opener against Chennai Super Kings.
We wish our Titan a speedy recovery and hope for his early return. pic.twitter.com/SVLu73SNpl — Gujarat Titans (@gujarat_titans) April 2, 2023
दुखापतीमुळे केन विल्यमसन यंदाच्या आयपीएलमधून बाहेर जाऊ शकतो असे संकेत मिळत होते. परंतु अखेर आज गुजरात टायटन्स संघाने केन विल्यमसनबाबत अधिकृतपणे माहिती देत तो दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर होत असल्याचे सांगितले. गुजरात टायटन्सने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, CSK, IPL 2023