मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : आयपीएलचं थ्रील आणखी वाढणार, नवे नियम ठरणार गेम चेंजर!

IPL 2023 : आयपीएलचं थ्रील आणखी वाढणार, नवे नियम ठरणार गेम चेंजर!

आयपीएलचा नवा नियम ठरणार गेम चेंजर

आयपीएलचा नवा नियम ठरणार गेम चेंजर

IPL 2023 आयपीएल 2023 च्या मोसमाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या या मोसमासाठी बरेच नवे नियम बनवण्यात आले आहेत, त्यामुळे यंदाचा मोसम आणखी रोमांचक होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : आयपीएल 2023 च्या मोसमाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. मोसमातला पहिलाच सामना गतविजेती गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होईल. आयपीएलच्या या मोसमासाठी बरेच नवे नियम बनवण्यात आले आहेत, त्यामुळे यंदाचा मोसम आणखी रोमांचक होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात फॉरमॅटपासून ते डीआरएस सिस्टीमपर्यंत बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आयपीएल 2023 चा फॉरमॅट

- आयपीएलच्या 10 टीम 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आल्या आहेत.

- ग्रुपच्या टीम ठरवण्यासाठी लॉटरी सिस्टीमचा वापर करण्यात आला, ज्यावरून कोणत्या टीम कोणत्या टीमविरुद्ध दोन वेळा आणि एकदा खेळणार हे निश्चित झालं.

- ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक टीम त्यांच्या ग्रुपमधल्या उर्वरित 4 टीमविरुद्ध दोनवेळा (एकदा घरी आणि दुसऱ्यांदा बाहेर) तर दुसऱ्या ग्रुपमधल्या चार टीमविरुद्ध एक-एक वेळा खेळणार आहेत, अशाप्रकारे प्रत्येक टीम 14 सामने खेळणार आहे.

- आयपीएलचा सामना जिंकणाऱ्या टीमला 2 पॉईंट्स मिळतील, तसंच कोणत्याही कारणास्तव मॅच होऊ शकली नाही तर प्रत्येक टीमला 1-1 पॉईंट देण्यात येईल. पराभव झालेल्या टीमला एकही पॉईंट मिळणार नाही.

-प्ले ऑफचे सामने आधीच्या नियमाप्रमाणेच होणार आहेत.

इम्पॅक्ट प्लेयरचा नवा नियम

- आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेयरचा नियम वापरण्यात येणार आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा हा नियम गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

- इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमानुसार टॉसवेळी प्रत्येक कर्णधाराला त्याच्या प्लेयिंग इलेव्हनसह चार पर्यायी खेळाडूंची नावंही सांगावी लागणार आहेत. कर्णधार मॅचच्या वेळी कधीही इम्पॅक्ट प्लेयरला मैदानात आणू शकतो. टॉसवेळी सांगितलेल्या 4 खेळाडूंपैकी एकाच खेळाडूचा कर्णधाराला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करण्यात येणार आहे. हा इम्पॅक्ट खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमधल्या खेळाडूच्या बदली खेळेल.

- बदली होऊन पॅव्हेलियनमध्ये गेलेला खेळाडू मॅचमध्ये पुन्हा खेळू शकणार नाही. तसंच बारावा खेळाडू म्हणूनही मैदानात फिल्डिंगला येऊ शकणार नाही.

- इम्पॅक्ट प्लेयर मॅचमध्ये कॅप्टन्सी करू शकणार नाही.

- इम्पॅक्ट प्लेयर रिटायर हर्ट झालेल्या खेळाडूच्या जागी बॅटिंगला येऊ शकतो.

- दोन्ही टीम प्रत्येक मॅचमध्ये एकदाच इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करू शकते.

- जर टीममध्ये 4 परदेशी खेळाडू खेळत असतील तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्यांना चौथा परदेशी खेळाडू वापरता येणार नाही.

डीआरएसचा नियम

आयपीएलमध्ये खेळाडू वाईड आणि नो बॉलसाठीही रिव्ह्यू घेऊ शकतली. महिला आयपीएलमध्ये या नियमाचा वापर करण्यात आला होता. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने सगळ्यात पहिल्यांदा या नियमाचा वापर केला.

कॅच आऊट झाल्यानंतर बॅटर अर्ध्या खेळपट्टीच्या पुढे गेला असला तरीही नवीन बॅटर स्ट्राईकला असेल. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट गेली तर मात्र नव्या बॅटरला स्ट्राईक मिळणार नाही.

First published:
top videos

    Tags: IPL 2023