जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : वानखेडेवर सूर्याने आग ओकली, विक्रमी शतक ठोकत गुजरातला धुतलं

IPL 2023 : वानखेडेवर सूर्याने आग ओकली, विक्रमी शतक ठोकत गुजरातला धुतलं

Photo-IPL/Twitter

Photo-IPL/Twitter

आयपीएल इतिहासामध्ये सूर्यकुमार यादवने पहिलं शतक झळकावलं आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने धमाका केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 मे : आयपीएल इतिहासामध्ये सूर्यकुमार यादवने पहिलं शतक झळकावलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 49 बॉलमध्ये 210 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 103 रनची खेळी केली. सूर्याच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 6 सिक्सचा समावेश आहे. या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने गुजरातला विजयासाठी 219 रनचं आव्हान दिलं. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. रोहित आणि इशान यांनी पहिल्या 6 ओव्हरमध्ये 61 रन केले, रोहित 31 रनवर तर इशान 29 रन करून आऊट झाला. विष्णू विनोदने 30 आणि नेहल वढेराने 15 रन केले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहित शर्माला 1 विकेट घेण्यात यश आलं. सूर्यकुमार यादव मागच्या काही सामन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या 5 सामन्यांमध्ये सूर्याची बॅट शांत होती. याआधी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार 83 रनवर आऊट झाला होता, पण आजच्या सामन्यात त्याने मागच्या मॅचची कसर भरून काढली आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या या मोसमात 12 मॅचमध्ये 43.55 ची सरासरी आणि 190.83 च्या स्ट्राईक रेटने 479 रन केले आहेत, यामध्ये 4 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. या मोसमात सूर्याने 54 फोर आणि 24 सिक्सही मारल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात