मुंबई, 25 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 35 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने दमदार अर्धशतक ठोकून संघासाठी चांगली कामगिरी केली. शुभमनच्या या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरवर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहे. मागील बऱ्याच काळापासून भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा चाहते शुभमनला भर मैदानात साराच्या नावावरून चिडवत असतात. परंतु अद्याप या दोघांनी ही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. साराच भाऊ अर्जुन तेंडुलकर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध शुभमन गिलने आयपीएलमधील आपले 17 वे अर्धशतकं ठोकले. शुभमनने 34 चेंडूत 56 धावा केल्या, त्याच्या या दमदार खेळीनंतर सारा तेंडुलकर सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसली.
नेटकऱ्यांनी शुभमनच्या अर्धशतकीय खेळीनंतर सारा तेंडुलकरवर भन्नाट मिम्स तयार केले. ज्याच्यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करता दिसले.
Sachin and Sara watching Shubman Gill 💀#MIvsGT #GTvMI pic.twitter.com/QpuKYgMvFK
— Ankit (@revengeseeker07) April 25, 2023
Whoever wins today,Sara will be happy🙂🙂
— Bhwani Shankar (@BhwaniShankar1) April 25, 2023
Sara Tendulkar vibing perfectly on KISI KA BHAI KISI KI JAAN#GTvsMI #IPLonJioCinema pic.twitter.com/3k0SsWFMON
Sara Tendulkar watching this match pic.twitter.com/Vn0qNWFZ49
— Sagar (@sagarcasm) April 25, 2023
Sara Tendulkar while watching match between ShubmanGill and Arjun Tendulkar 😌#GTvsMI #GTvMI pic.twitter.com/5ptef3bVQ2
— Abhinav Jha 🇮🇳 (@abhinavj617) April 25, 2023
सारा तेंडुलकर वरील मिम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.