मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 MI vs GT : शुभमन गिल सुसाट! IPL 2023 मध्ये ठोकलं तिसरं शतक

IPL 2023 MI vs GT : शुभमन गिल सुसाट! IPL 2023 मध्ये ठोकलं तिसरं शतक

शुभमन गिल सुसाट! IPL 2023 मध्ये ठोकलं तिसरं शतक

शुभमन गिल सुसाट! IPL 2023 मध्ये ठोकलं तिसरं शतक

आयपीएल 2023 मध्ये आज 73 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपाडला. या सामन्यात शुभमन गिलने मुंबई विरुद्ध दमदार शतक ठोकून यंदाच्या आयपीएलमधील आपलं तिसरं शतक पूर्ण केलं आहे.

मुंबई, 26 मे : आयपीएल 2023 मध्ये आज 73 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपाडला. या सामन्यात शुभमन गिलने मुंबई विरुद्ध दमदार शतक ठोकून यंदाच्या आयपीएलमधील आपलं तिसरं शतक पूर्ण केलं आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरात टायटन्सकडून फलंदाजीसाठी शुभमन गिल आणि रिद्धिमान साहाची जोडी उतरली. शुभमन गिलने सुरुवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांवर प्रेशर बनवून मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.  शुभमन गिलने 15 वी ओव्हर सुरु असताना त्याचे शतक पूर्ण केले. शुभमनने 49 चेंडूंमध्ये त्याच्या वैयक्तिक 100 धावा पूर्ण केल्या यासह तो आयपीएल 2023 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

ऑरेंज कॅपने डोकं बदललं :

आयपीएल 2023 मध्ये मागील अनेक दिवसांपासून आरसीबीचा कर्णधार फाफ दु प्लेसिस हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 14 सामन्यांमध्ये 730 धावा केल्यामुळे ऑरेंज कॅप ही त्याच्याकडे होती. परंतु आता ऑरेंज कॅपने डोकं बदललं असून गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमनच्या डोक्यावर ही कॅप सजली आहे. शुभमन गिल हा साधय आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून त्याने त्याने 16 सामन्यात 821 धावा केल्या आहेत.

शुभमन गिलने आयपीएल 2023 मधले त्याचे पहिले शतक सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध ठोकले होते. तर दुसरे शतक त्याने आरसीबी विरुद्ध ठोकून आरसीबीची प्लेऑफमध्ये जाण्याची वाट अडवली होती. तर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने आपले तिसरे शतक ठोकले आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, Mumbai Indians, Rohit Sharma, Shubhman Gill