जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs GT : सूर्याचा Six पाहून क्रिकेटचा देव ही भारावला, दिली अशी रिअ‍ॅक्शन

IPL 2023 MI vs GT : सूर्याचा Six पाहून क्रिकेटचा देव ही भारावला, दिली अशी रिअ‍ॅक्शन

सूर्याचा Six पाहून क्रिकेटचा देव ही भारावला, दिली अशी रिअ‍ॅक्शन

सूर्याचा Six पाहून क्रिकेटचा देव ही भारावला, दिली अशी रिअ‍ॅक्शन

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या मॅचमध्ये सूर्यकुमारने तुफान खेळी करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. यादरम्यान सूर्याने ठोकलेला एक सिक्स पाहून सचिन तेंडुलकर ही भारावला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मे : आयपीएल 2023 मधील 57 वी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडली. या मॅचमध्ये सूर्यकुमारच्या वादळी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने तब्बल 27 धावांनी गुजरातवर विजय मिळवला. या रोमांचक मॅचमध्ये सूर्यकुमारने तुफान खेळी करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. यादरम्यान सूर्याने ठोकलेला एक सिक्स पाहून सचिन तेंडुलकर ही भारावला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अटीतटीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु मुंबईच्या टीमने गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरश धुतले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 29, ईशान किशनने 31, विष्णू विनोदने 30, नेहाला वढेराने 15 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने मात्र चौफेर फटकेबाजी करून 49 चेंडूत 103 धावा केल्या.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

सूर्यकुमारने आयपीएलमधील त्याची पहिली सेंचुरी झळकावताना 11 चौकार तर 6 सिक्सची अतिशबाजी केली. यादरम्यान सूर्यकुमारने मारलेला एक स्विप शॉट  पाहून वानखेडेच्या स्टॅन्डमध्ये बसलेला सचिन तेंडुलकर ही भारावला. सध्या सचिनने सूर्याच्या शॉटवर दिलेली ही रिअ‍ॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात