मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 MI vs GT : IPL 2023 : बॉलिंग आणि फिल्डिंगने केला मुंबईचा घात, सहावी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं!

IPL 2023 MI vs GT : IPL 2023 : बॉलिंग आणि फिल्डिंगने केला मुंबईचा घात, सहावी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं!

IPL 2023 : बॉलिंग आणि फिल्डिंगने केला मुंबईचा घात, सहावी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं!

IPL 2023 : बॉलिंग आणि फिल्डिंगने केला मुंबईचा घात, सहावी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं!

आयपीएल 2023 मधील 73 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.

अहमदाबाद, 26 मे : आयपीएल 2023 मधील 73 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. गुजरातने मुंबईवर 62 धावांनी विजय मिळवला असून सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात टायटन्सकडून फलंदाजीसाठी शुभमन गिल आणि रिद्धिमान साहाची जोडी मैदानात उतरली. शुभमन गिलने मुंबई इंडियन्स विरुद्ध 49 चेंडूत त्याचे आयपीएल 2023  मधील तिसरे शतक ठोकले. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने सर्वाधिक 129 धावा केल्या, याशिवाय रिद्धिमान साहाने 18, साई सुदर्शनने 43, हार्दिक पांड्याने 28 तर राशिद खानने 5 धावा केल्या.

गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 233 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला 234 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि नेहाला वढेरा उतरला. ईशान किशनला दुखापत झाल्यामुळे नेहाला वधेराला सलामी फलंदाज म्हणून उतरण्याची संधी मिळाली. परंतु यावेळी मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मुंबई इंडियन्सकडून कॅमेरून ग्रीनने 30, सूर्यकुमार यादवने 61, तिलक वर्माने 4 धावा केल्या. तर मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. अखेर मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव झाला आणि यासोबतच गुजरात टायटन्सने थेट आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आयपीएल 2023 चा फायनल मुकाबला चेन्नई सुपरकिंग्स  विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. रविवारी 28 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यातून स्पर्धेला त्यांचा 16 वा विजेता मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, IPL 2023, Mumbai Indians, Rohit Sharma, Shubhman Gill