अहमदाबाद, 26 मे : आयपीएल 2023 च्या क्वालिफायर-2 मध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईच्या बॉलरनी सुरूवातीला गुजरातचे ओपनर शुभमन गिल आणि ऋद्धीमान साहा यांना रोखून धरलं. अहमदाबादमध्ये पाऊस झाल्यामुळे हा सामना सुरू व्हायला उशीर झाला, पण मुंबईच्या फास्ट बॉलरनी सुरूवातीच्या वातावरणाचा चांगला फायदा उचलला, पण पॉवर-प्ले संपत असतानाच मुंबईने घोडचूक केली.
पॉवर-प्लेची शेवटची म्हणजेच सहावी ओव्हर रोहित शर्माने क्रिस जॉर्डनला दिली. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर गिलच्या बॅटची इनसाईड एज लागली आणि गिल थोडक्यात बचावला, यानंतर पाचव्या बॉलला गिल मिड ऑनच्या दिशने मोठा शॉट मारायला गेला, पण टीम डेव्हिडने सोपा कॅच सोडला. कॅच सोडला तेव्हा गिल 20 बॉलमध्ये 30 रनवर खेळत होता. यानंतर त्याने 32 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं, तर 49 बॉलमध्येच गिलचं शतक पूर्ण झालं. गिलच्या या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता.
Extraordinary!😯 Shubman Gill is putting on a show once again with his supreme batting 💥#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @ShubmanGill pic.twitter.com/aE8nEZxI19
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सन लखनऊ सुपर जाएंट्सचा 81 रननी पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये पोहोचली आहे. तर क्वालिफायर-1 च्या सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभलव केला होता. लीग स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळे गुजरातला फायनलमध्ये खेळण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
मुंबई आणि गुजरात यांच्यातल्या ज्या टीमचा क्वालिफायर-2च्या सामन्यात विजय होईल ते फायनलमध्ये प्रवेश करतील. रविवार 28 मे रोजी चेन्नईविरुद्ध मुंबई-गुजरातमधली विजयी टीम सीएसकेविरुद्ध फायनल खेळेल.
मुंबईची टीम
रोहित शर्मा, इशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, क्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल
गुजरातची टीम
शुभमन गिल, ऋद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, IPL 2023, Mumbai Indians, Shubhman Gill