जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : न्यूज अँकर ते IPL 2023 चं मराठी अँकरिंग, मुंबईची पूर्वी भावे कशी झाली 'मंदिरा बेदी', Video

IPL 2023 : न्यूज अँकर ते IPL 2023 चं मराठी अँकरिंग, मुंबईची पूर्वी भावे कशी झाली 'मंदिरा बेदी', Video

IPL 2023 : न्यूज अँकर ते IPL 2023 चं मराठी अँकरिंग, मुंबईची पूर्वी भावे कशी झाली 'मंदिरा बेदी'

IPL 2023 : न्यूज अँकर ते IPL 2023 चं मराठी अँकरिंग, मुंबईची पूर्वी भावे कशी झाली 'मंदिरा बेदी'

IPL 2023 : मराठी अभिनेत्री पूर्वी भावेला मराठी आयपीएलची मंदिरा बेदी होण्याची संधी कशी मिळाली हे तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 5 मे : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची क्रेझ सध्या शिगेला पोहचली आहे. या सिझनचे साखळी सामने आता शेवटच्या टप्प्यात पोहचलेत. त्यानंतरही कोणत्या टीम प्ले ऑफमध्ये जाणार हे निश्चित झालेलं नाही. आयपीएल स्पर्धेचा हा संपूर्ण थरार आपल्या मराठी भाषेत क्रिकेट फॅन्सना अनुभवयाला मिळतोय. या आयपीएल सिझनमध्ये मुंबईकर पूर्वी भावेचं नाव आता घरोघरी पोहचलंय. कोण आहे ही पूर्वी? तिला आयपीएलची संधी कशी मिळाली? या सिझनमधील कोणत्या टीम तिला आवडतात? ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कशी मिळाली संधी? मुंबईतील दादरमध्ये लहानाची मोठी झालेल्या पूर्वीला क्रिकेट काही नवं नाही. तिनं लहानपणापासूनच  शिवाजी पार्कवर क्रिकेटचा थरार अनुभवला आहे. यापूर्वी ती एका वृत्तवाहिनीमध्ये न्यूज अँकर होती. तेव्हाही तिनं स्पोर्ट्स बुलेटीन सादर केलंय. वृत्तवाहिनीप्रमाणेच अनेक मालिका, चित्रपट तसंच विविध कार्यक्रमातून पूर्वीनं स्वत:चा ठसा उमटवलाय.

News18लोकमत
News18लोकमत

आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये मराठी भाषेत होणाऱ्या कार्यक्रमातील पहिली महिला अँकर होण्याचा मान पूर्वीला मिळालाय. हा सर्व प्रवास अचानक झाल्याचं तिनं सांगितलं. ‘मार्च महिन्याच्या सुरुवातीला मराठीत आयपीएलचे कार्यक्रम करता येतील असं मला वाटलंही नव्हतं. मी ऑडिशन दिलं आणि सिलेक्ट झाले. 31 मार्च रोजी मराठी आयपीएलमध्ये अँकरिंगचा माझा प्रवास सुरू झाला. महिला म्हणून मला ही संधी मिळाली त्याचा मला फार आनंद आहे. क्रिकेट खेळ हा प्रामुख्याने पुरुषांचा आहे असं म्हटलं जातं मात्र आता महिलांची क्रिकेट सामने सुरू झालेले आहेत. मुलीही क्रिकेट चा आनंद लुटतात त्यांना टेक्निकल गोष्टी माहीत नसतील मात्र त्या क्रिकेटचा आनंद लुटतात. मात्र अँकरिंग करताना सोबत बरेच पुरुषच असतात. ज्येष्ठ क्रिकेटपटू किरण मोरे यांच्यासह केदार जाधव, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड या तरुण क्रिकेटपटूंसोबत मी स्पेशल शो केले आहेत, असा अनुभव पूर्वीनं सांगितला. लहान कार्यक्रम ते थेट IPL कॉमेंट्री, कशी घेतली कोल्हापूरच्या प्रसादनं भरारी? पाहा Video मी लहानपणी कधी क्रिकेट खेळलेली नाही. मात्र या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी खेळातील सर्व बारकाव्यांचा अभ्यास केला आहे. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या माझ्या आवडत्या टीम आहेत. विदेशी खेळाडूंमध्ये फाफ ड्यू प्लेसिसच्या प्रोफेशनलनिझम आवडला. तर तरूण भारतीय खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह यांनी प्रभावित केलं आहे, ‘ असं पूर्वीनं स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात