जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL2023 चा थरार वाढवणार नवे 8 नियम, जाणून घ्या काय झालेत बदल

IPL2023 चा थरार वाढवणार नवे 8 नियम, जाणून घ्या काय झालेत बदल

आयपीएल 2023च्या नियमांत मोठे बदल! टॉस झाल्यानंतर ठरवता येणार संघ

आयपीएल 2023च्या नियमांत मोठे बदल! टॉस झाल्यानंतर ठरवता येणार संघ

IPL 2023 New Rule : नव्या नियमांमध्ये इम्पॅक्ट प्लेअरसह टॉसनंतर प्लेइंग इलेव्हन निवडण्याची मुभा असेल. तसंच वाइड आणि नो बॉलसाठीही डीआरएस घेता येणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 मार्च : आयपीएल २०२३ ची सुरुवात होण्यास आठवड्याचा कालावधी राहिला आहे. यंदाचा हंगाम नव्या रुपात खेळला जाईल. यात जवळपास ८ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांमध्ये इम्पॅक्ट प्लेअरसह टॉसनंतर प्लेइंग इलेव्हन निवडण्याची मुभा असेल. तसंच वाइड आणि नो बॉलसाठीही डीआरएस घेता येणार आहे. इम्पॅक्ट प्लेअर बीसीसीआयने आयपीएल २०२३ मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम आणला आहे. यानुसार संघात ११ च्या जागी १२ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. जेव्हा संघाला इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करायचा असेल तेव्हा पंच मैदानावर हाताने क्रॉस सिग्नल दाखवतील. नाणेफेक जिंकल्यानंतर प्लेइंग इलेव्हनची निवड कर्णधारांना आयपीएल २०२३ च्या सामन्यांवेळी दोन टीम शीट घेऊन नाणेफेक करण्यासाठी येता येईल. नाणेफेक जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर त्यांना काय करायचंय याचा निर्णय ते लगेच घेतली. त्यानतंर त्यांना कोणतीही एक शीट द्यावी लागेल ज्यात प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंची यादी असेल. आतापर्यंत कर्णधारांना टीम शीट सामन्याआधी अधिकाऱ्यांकडे सोपवावी लागत होती. पाकिस्तानी क्रिकेटपटूला विष देऊन मारण्याचा प्रयत्न, आफ्रिदीने पाण्यासारखे पैसे खर्च करून वाचवलं!   डीआरएसचा वापर आयपीएल २०२३च्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक डावात संघांना दोन डीआरएस घेता येतील. त्यात आता वाइड बॉल आणि नो बॉलसाठीही डीआरएसचा वापर करता येणार आहे. झेलबाद झाल्यानंतर स्ट्राइक चेंज फलंदाज झेलबाद झाल्यास, तेव्हा फलंदाजांनी क्रीजवर क्रॉस केलं असेल किंवा नसेल तरीही येणारा फलंदाज स्ट्राइकला असेल. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाल्यास हा नियम पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूला लागू नसेल. खेळाडूंना कोरोना झाल्यास एखाद्या संघाला कोरोनामुळे प्लेइंग इलेव्हन पूर्ण करता न आल्यास बीसीसीआय सामना रिशेड्युल करेल. तर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील कोणी कोरानाबाधित आढळल्यास त्यांना ७ दिवस आयसोलेशनमध्ये रहावं लागेल. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते संघात सहभागी होऊ शकतात. IPL 2023 : आयपीएल 2023 मधील सर्वात महागडे 5 क्रिकेटर, ज्यांनी कमाईच्या बाबतीत दिग्गज खेळाडूंनाही टाकलं मागे प्लेऑफ/ फायनल सुपर ओव्हर किंवा सुपर सुपर ओव्हर काही कारणाने पूर्ण न झाल्यास विजेता कोणाला घोषित करायचं याबाबतही नियम तयार केला आहे. अशा परिस्थितीत लीगमध्ये टॉपला असलेला संघ विजेता घोषित केला जाईल. वेळेत षटके न टाकल्यास निर्धारित वेळेत डाव पूर्ण झाला नाही, किंवा अखेरची षटके वेळेपेक्षा उशिरा टाकली जात असीतल तर ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त ४ क्षेत्ररक्षक ठेवण्याची ओव्हर रेट पेनल्टी लावण्यात येईल. विकेटकिपर, फिल्डरकडून चुकीच्या हालचाली विकेटकिपरच्या चुकीच्या कृतीबद्दल प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा पेनल्टी म्हणून दिल्या जातील. तसंच तो चेंडू डेड बॉल ठरवण्यात येईल. तर क्षेत्ररक्षकाने चुकीच्या हालचाली केल्यास अशीच पेनल्टी संबंधित संघाला लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात