सॅम करन : इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिकेटर सॅम करन हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्सने सॅम करनला तब्बल 18.50 कोटींची बोली लावून खरेदी केले.
कॅमेरून ग्रीन : ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटर कॅमेरून ग्रीन हा आयपीएल 2023 मधील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना त्याला खरेदी केले आहे.
बेन स्टोक्स : इंग्लडचा खेळाडू बेन स्टोक्स हा यंदा धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघात खेळताना दिसणार आहे. चेन्नईने आयपीएल ऑक्शनमध्ये त्याच्यावर 16.25 कोटींची बोली लावून त्याला खरेदी केले होते.
निकोलस पूरन : वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज निकोलस पूरन याला लखनौ सुपर जाएंट्स संघाने 16 कोटींना विकत घेतले होते.
हॅरी ब्रूक : इंग्लंडचा क्रिकेटर हॅरी ब्रूक हा आयपीएल 2023 मधील पाचव्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. सनरायजर्स हैद्राबाद या संघाने हॅरी ब्रूक याला 13. 25 कोटींना विकत घेतले.