जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानी क्रिकेटपटूला विष देऊन मारण्याचा प्रयत्न, आफ्रिदीने पाण्यासारखे पैसे खर्च करून वाचवलं!

पाकिस्तानी क्रिकेटपटूला विष देऊन मारण्याचा प्रयत्न, आफ्रिदीने पाण्यासारखे पैसे खर्च करून वाचवलं!

पाकिस्तानी खेळाडूवर विषप्रयोग

पाकिस्तानी खेळाडूवर विषप्रयोग

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेटपटूचा जीव वाचवला आहे. यासाठी शाहिद आफ्रिदीने तब्बल 50 ते 60 लाख रुपये खर्च केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मार्च : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेटपटूचा जीव वाचवला आहे. यासाठी शाहिद आफ्रिदीने तब्बल 50 ते 60 लाख रुपये खर्च केले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू इमरान नझीरने याबाबतचा खुलासा केला आहे. माझ्यासोबत विषप्रयोग झाल्याचा खळबळजनक दावा इमरान नझीरन केला आहे. ‘माझ्यावर उपचार सुरू असताना एमआरआय आणि इतर टेस्ट केल्या गेल्या, तेव्हा मला विष दिलं गेल्याचं समोर आलं. मर्करी हे एक प्रकारचं स्लो पॉयझन असतं, जे गुडघ्यापर्यंत पोहोचतं आणि तुमचं प्रचंड नुकसान करतं. 8-10 वर्ष माझ्या गुडघ्यांवर उपचार झाले. उभा राहण्यासाठी मी प्रार्थना करत होतो. आजारी असतानाही मी चालत फिरत होतो,’ असं इमरान नझीर म्हणाला. ‘मला हे स्लो पॉयझन कुणी दिलं, याबाबत अजूनही कळालेलं नाही. मर्करी पॉयझनचा इफेक्ट 6 ते 8 महिन्यांनंतर सुरू होतो. लगेचच त्रास सुरू झाला तर तुमच्यासोबत हे कुणी केलंय हे कळू शकतं. तरीही माझ्यासोबत ज्याने वाईट केलं, त्याचं मी कधीच वाईट चिंतलं नाही. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. आज मी स्वत:च्या पायावर चालत आहे,’ अशी प्रतिक्रिया इमरान नझीरने दिली. ‘या आजारपणात माझ्याकडे असलेले सगळे पैसे खर्च झाले. फायनल ट्रिटमेंटमध्ये शाहिद आफ्रिदीने मला मदत केली, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. मला खूप जास्त गरज असताना या माणसाने माझी मदत केली, कारण तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. माझी शाहिद आफ्रिदीसोबत एक बैठक झाली होती. त्याने एका दिवसामध्येच माझ्या डॉक्टरच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा केले,’ असं इमरान नझीरने सांगितलं. शाहिद आफ्रिदीने कोणताही विचार न करता माझी मदत केली. किती पैसे लागणार आहेत, हे त्याने एकदाही विचारलं नाही. जेवढे पैसे लागतील तेवढे लागू दे, पण माझा भाऊ बरा होऊ दे, असं आफ्रिदी डॉक्टरांना म्हणाला. माझ्या उपचारासाठी 50 ते 60 लाख खर्च झाले, आफ्रिदीने पैसे देताना एका क्षणाचाही विचार केला नाही, असं इमरान नझीर म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात