मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : रोहितची खास माणसं वाढवणार त्याचंच टेन्शन, मुंबईला या दोन खेळाडूंपासून धोका

IPL 2023 : रोहितची खास माणसं वाढवणार त्याचंच टेन्शन, मुंबईला या दोन खेळाडूंपासून धोका

मुंबई इंडियन्सचा एलिमिनेटरमध्ये लखनऊशी सामना

मुंबई इंडियन्सचा एलिमिनेटरमध्ये लखनऊशी सामना

आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना कृणाल पांड्याच्या लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chennai, India

चेन्नई, 24 मे : आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना कृणाल पांड्याच्या लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध होणार आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना करो या मरो आहे, कारण चेन्नईत होणाऱ्या या मॅचमध्ये पराभूत होणाऱ्या टीमचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल. तर विजयी टीम 26 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल. मुंबई आणि लखनऊ यांचं एकमेकांविरुद्धचं रेकॉर्ड बघितलं तर रोहितच्या टीमसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो.

2022 साली आयपीएलमध्ये एण्ट्री घेतलेल्या लखनऊ आणि मुंबईचा आतापर्यंत तीन वेळा सामना झाला आहे. या तीनही वेळा लखनऊचा विजय झाला आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊने मुंबईला दोन्ही वेळा पराभूत केलं होतं. आयपीएल 2023 मध्ये 16 मे रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये या दोन्ही टीममध्ये लढत झाली होती, तेव्हा लखनऊने हा सामना 5 रनने जिंकला होता. या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने नाबाद 89 रन आणि कृणाल पांड्याने नाबाद 49 रन केले होते.

'आता क्रिकेट सोडून दे', आरसीबी खेळाडूच्या इमोशनल पोस्टवर चाहत्यांचा संताप

रोहितचेच खास खेळाडू मुंबईसाठी धोकादायक

एलिमिनेटरच्या या सामन्यात लखनऊच्या टीममध्ये असे दोन खेळाडू आहेत, ज्यांनी मुंबईला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. क्विंटन डिकॉक आणि कृणाल पांड्या हे एकेकाळी मुंबईच्या टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. डिकॉकने 2019 ते 2021 पर्यंत मुंबईकडून खेळताना 43 सामन्यांमध्ये 34.07 च्या सरासरीने 1,329 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेट 131.32 एवढा होता.

कृणाल पांड्याने 2016 ते 2021 मध्ये मुंबईकडून खेळताना 84 सामन्यांमध्ये 22.86 ची सरासरी आणि 138.54 च्या सरासरीने 1143 रन केले, याशिवाय त्याने मुंबईसाठी 51 विकेटही घेतल्या आहेत. कधीकाळी रोहितसाठी खास असलेले हे खेळाडू आता त्याच्याच टीमसाठी धोकादायक ठरू शकतात.

आयपीएलच्या या मोसमात क्विंटन डिकॉकने 4 सामन्यांमध्ये 143 रन, निकोलस पूरनने 14 सामन्यांमध्ये 358 रन, मार्कस स्टॉयनिसने 14 सामन्यांमध्ये 368 रन आणि काईल मायर्सने 12 सामन्यांमध्ये 361 रन केले आहेत. कर्णधार कृणाल पांड्याने 7.23 च्या इकोनॉमी रेटने 9 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 14 सामन्यांमध्ये 180 रनही केल्या आहेत. लखनऊकडून रवी बिष्णोईने 16, मार्क वूड 11 आणि यश ठाकूरने 10 विकेट मिळवल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: IPL 2023, Lucknow Super Giants, Mumbai Indians