मुंबई, 24 मे : आयपीएल 2023 मध्ये आरसीबीची कामगिरी निराशाजनक राहिली. संपूर्ण मोसमात ही टीम 11 खेळाडू नाही तर फक्त 4 खेळाडूंच्याच भरवशावर खेळताना दिसत होती. विराट कोहली, फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंनीच रन केले तर बॉलिंगमध्ये मोहम्मद सिराजची कामगिरीही ठिकठाक राहिली. फक्त चार खेळाडूच चांगले खेळत असल्यामुळे आरसीबीला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. आयपीएल 2022 चा हिरो दिनेश कार्तिक या मोसमात फ्लॉप ठरला.
दिनेश कार्तिकने या मोसमात आरसीबीकडून 13 मॅच खेळल्या, यात त्याने 11.67 च्या स्ट्राईक रेटने 140 रन केले. मिडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे आरसीबीला धक्का बसला. आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. दिनेश कार्तिकच्या या पोस्टवर आरसीबीचे चाहते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत.
'आम्ही अपेक्षांवर खरे उतरलो नाही. निकाल आमच्या बाजूने लागला नाही. स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पुढेही त्याचा पाठलाग करत राहू. चांगल्या आणि वाईट काळात साथ दिल्यामुळे चाहत्यांचे धन्यवाद, तूम्हीच आमच्यासाठी जग आहात,' असं दिनेश कार्तिक त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.
DK, It is a good time for you to make the switch into full-time commentary.
— Vipin Tiwari (@vipintiwari952) May 23, 2023
Bhai tu chode yar RCB important match me koi duck hota hai kya
— Sagar Nimbarga (@nimbarga_sagar) May 23, 2023
आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय गरजेचा होता. आरसीबीने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला, पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना धक्का बसला, ज्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. या मोसमात आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर राहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.