मुंबई, 8 एप्रिल : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पहिला सामना गमावलेली मुंबई इंडियन्स होम ग्राऊंडवरील पहिला सामना जिंकण्यासाठी झुंज देत असतानाच चेन्नईचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने संघासाठी अर्धशतक ठोकल आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात धोनीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनंतर मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 157 धावा केल्या. यानंतर मुंबईने चेन्नईला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 158 धावा करण्याचे आव्हान दिले. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. ओपनिंग बॅट्समन म्हणून आलेला डेव्हॉन कॉन्वे 4 चेंडूवर 0 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे ने संघासाठी चांगलाच जोर धरला.
अजिंक्यने मैदानात उतरताच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 27 चेंडूवर 61 धावा करताना त्याने 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. परंतु अखेर तो आठव्या ओव्हरमध्ये पीयूष चावलाच्या चेंडूचा शिकार ठरला. अजिंक्यच्या बॅटमधून निघालेला शॉट सूर्यकुमार यादवने पकडला. मात्र चेन्नईसाठी केलेल्या या अर्धशतकीय खेळीनंतर अजिंक्य पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे.
Fastest 50 of IPL 2023. Guess who it is? It's not Kohli,Rohit or Dhoni but Ajinkya Rahane. 52(19)* 🔥❤️#CSKvsMIhttps://t.co/P0sMi4PDKz
— Sexy Cricket Shots (@sexycricketshot) April 8, 2023
मागील बऱ्याच काळापासून अजिंक्य रहाणे याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाहीये तसेच आयपीएल 2023 मध्ये ही चेन्नई सुपरकिंग्स चा भाग असून देखील पहिल्या दोन सामन्यात रहाणेला चेन्नईच्या प्लेयिंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. परंतु धोनीने मुंबईच्या होम ग्राउंडवर अजिंक्यच्या रूपाने आपले ट्रम्प कार्ड बाहेर काढले आणि मिळालेल्या संधीचे अजिंक्य रहाणेने देखील सोने केले. अजिंक्य रहाणेने ठोकलेले अर्धशतक हे आयपीएल 2023 मधील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. त्याने केवळ 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.