जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबई इंडियन्सने केली मोठी चूक, विराटच्या कोचने सांगितली

IPL 2022 : मुंबई इंडियन्सने केली मोठी चूक, विराटच्या कोचने सांगितली

IPL 2022 : मुंबई इंडियन्सने केली मोठी चूक, विराटच्या कोचने सांगितली

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरू व्हायला आता आठवडाच शिल्लक आहे, त्यामुळे सगळ्या टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे. त्याआधी विराट कोहलीचे (Virat Kohli) लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सबाबत (Mumbai Indians) एक वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरू व्हायला आता आठवडाच शिल्लक आहे, त्यामुळे सगळ्या टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे. त्याआधी विराट कोहलीचे (Virat Kohli) लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सबाबत (Mumbai Indians) एक वक्तव्य केलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावामध्ये मोठी चूक केल्याचं मत राजकुमार शर्मा यांनी मांडलं आहे. मुंबईच्या टीमला यंदा ट्रेन्ट बोल्टची (Trent Boult) कमी जाणवेल, असं राजकुमार शर्मा म्हणाले आहेत. बोल्ट आणि बुमराहच्या जोडीने मुंबईला अनेक सामने जिंकवून दिले, पण मुंबईने बोल्टला रिटेन केलं नाही आणि नंतर त्याच्यावर बोलीही लावली नाही. ट्रेन्ट बोल्ट यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना दिसेल. राजस्थानने बोल्टला 8 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. बोल्टने आयपीएल 2020 साली मुंबईकडून खेळताना धमाकेदार कामगिरी केली, त्या मोसमात बोल्टने तब्बल 25 विकेट घेतल्या होत्या, ज्यामुळे मुंबई चॅम्पियन झाली होती. मुंबई इंडियन्सकडे आता डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट आणि टायमल मिल्स हे फास्ट बॉलर आहेत. मुंबई या मोसमात डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला संधी देईल, कारण त्याच्याकडे अनुभव आहे, असं राजकुमार शर्मा म्हणाले. मुंबई इंडियन्सकडे यंदा कमजोर ऑलराऊंडर आहे, असंही राजकुमार शर्मा यांना वाटतं, त्यामुळे कायरन पोलार्डची भूमिका महत्त्वाची ठरते. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. मुंबईची टीम रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, एम अश्विन, बासिल थंपी, फॅबियन एलन, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शौकीन, राहुल बुद्धी, रमणदीप सिंह, अनमोलप्रीत सिंग, अरशद खान, राइली मेरेडिथ, टीम डेविड, टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स, जोफ्रा आर्चर, संजय यादव, एन तिलक वर्मा, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात