मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट एकदाही झाला नाही IPL चॅम्पियन, पण हा खेळाडू काहीही न करता जिंकला 2 ट्रॉफी!

विराट एकदाही झाला नाही IPL चॅम्पियन, पण हा खेळाडू काहीही न करता जिंकला 2 ट्रॉफी!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली आहे. एकीकडे गुजरातच्या कामगिरीचं क्रिकेट तज्ज्ञ आणि रसिक कौतुक करत आहेत, पण या टीममध्ये एक असाही खेळाडू होता जो त्यांच्यासाठी लकी ठरला.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली आहे. एकीकडे गुजरातच्या कामगिरीचं क्रिकेट तज्ज्ञ आणि रसिक कौतुक करत आहेत, पण या टीममध्ये एक असाही खेळाडू होता जो त्यांच्यासाठी लकी ठरला.

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली आहे. एकीकडे गुजरातच्या कामगिरीचं क्रिकेट तज्ज्ञ आणि रसिक कौतुक करत आहेत, पण या टीममध्ये एक असाही खेळाडू होता जो त्यांच्यासाठी लकी ठरला.

मुंबई, 31 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली आहे. आपली पहिलीच आयपीएल खेळणाऱ्या गुजरातला पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम करता आला आहे. हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, राशिद खान, राहुल तेवातिया आणि मोहम्मद शमी या खेळाडूंनी आयपीएलचा संपूर्ण मोसम गाजवला, त्यामुळेच गुजरातला हे यश मिळालं. एकीकडे गुजरातच्या कामगिरीचं क्रिकेट तज्ज्ञ आणि रसिक कौतुक करत आहेत, पण या टीममध्ये एक असाही खेळाडू होता जो त्यांच्यासाठी लकी ठरला.

विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीकडून (RCB) खेळतो आहे, पण 15 वर्षांमध्ये त्याला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे गुजरातचा ऑलराऊंडर विजय शंकर (Vijay Shankar) दोनवेळा आयपीएल जिंकणाऱ्या टीमचा भाग होता. मुख्य म्हणजे या दोन्ही वेळा विजय शंकरला फार खेळण्याची संधी मिळालीच नाही. 2016 साली विजय शंकर हैदराबादच्या टीममध्ये होता, पण तेव्हा तो एकही सामना खेळला नाही.

आयपीएलच्या या मोसमात शंकर गुजरातकडे होता. यावेळी त्याला 4 मॅच खेळण्याची संधी मिळाली, पण यातही तो फ्लॉप ठरला. 4.35 च्या सरासरीने त्याने फक्त 19 रन केले. तसंच बॉलिंगमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. विजय शंकरने आयपीएलमध्ये 51 मॅच खेळल्या, यात त्याने 24 च्या सरासरीने 731 रन केले, तसंच त्याच्या खात्यात 9 विकेटही आहेत.

गुजरात टायटन्सने विजय शंकरला 1.4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. एकेकाळी विजय शंकरला हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून पाहिलं जायचं. हार्दिक जेव्हा फिट नसायचा तेव्हा विजय शंकरला खेळण्याची संधी मिळायची.

2019 वर्ल्ड कपमध्येही खेळला शंकर

विजय शंकर 2019 वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2019) टीम इंडियाकडून खेळला. टीमला जेव्हा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मिळत नव्हता तेव्हा विजय शंकरला खेळवण्यात आलं, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. वर्ल्ड कपसाठी विजय शंकरची निवड झाल्यानंतरही बराच वाद निर्माण झाला होता. अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरची टीम इंडियात निवड झाली. तेव्हाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विजय शंकर थ्री डी प्लेयर असल्याचं वक्तव्य केलं होतं. 2019 वर्ल्ड कपनंतर मात्र विजय शंकरची टीम इंडियात निवड झाली नाही.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB, Virat kohli