मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 मधला (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) प्रवास संपला आहे. सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईसाठी यंदाचा मोसम निराशाजनक राहिला. या सिझनमध्ये रोहित शर्माच्या टीमला 14 पैकी 10 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला, तर फक्त 4 सामन्यांमध्ये टीमचा विजय झाला. मुंबई इंडियन्सचं जहाज बुडवण्यात तीन खेळाडू सर्वाधिक जबाबदार राहिले.
कायरन पोलार्ड
मुंबई इंडियन्सचा आक्रमक खेळाडू कायरन पोलार्डसाठी (Kieron Pollard) यंदाचा मोसम खराब ठरला. 11 मॅचमध्ये त्याने 14.40 च्या सरासरीने 144 रन केले. बॉलिंगमध्येही तो अपयशी ठरला. 8.93 च्या इकोनॉमी रेटने त्याला 4 विकेट मिळाल्या. आयपीएल सुरू व्हायच्या आधीच पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला, त्यामुळे आता पोलार्ड पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का नाही, याबाबत साशंकता आहे. मुंबईने लिलावाआधी पोलार्डला रिटेन केलं होतं.
टायमल मिल्स
मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा डावखुरा फास्ट बॉलर टायमल मिल्सला (Tymal Mills) 1.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. मुंबईने लिलावात घेतलेला हा निर्णय मैदानात चुकीचा सिद्ध झाला. आयपीएल 2022 मध्ये मिल्सने 5 मॅचमध्ये फक्त 6 विकेट घेतल्या, या दरम्यान त्याची सरासरीही 11 पेक्षा जास्तची होती. या कारणामुळे मिल्सला टीममधूनही बाहेर करण्यात आलं. यानंतर दुखापत झाल्यामुळे तो इंग्लंडला परतला. चार वर्षांनंतर टायमल मिल्सला खेळण्याची संधी मिळाली होती.
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मादेखील (Rohit Sharma) मुंबईच्या खराब कामगिरीचं कारण ठरला. रोहितने या मोसमात 14 मॅचमध्ये 19.14 च्या सरासरीने फक्त 268 रन केले, याता त्याचा स्ट्राईक रेट 120.18 चा होता. तसंच त्याला यंदा एकही अर्धशतक करता आलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians, Rohit sharma