जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : पोलार्ड मागे फिरला असता तर... कृणालच्या कृत्यावर मुंबईचा खेळाडू भडकला

IPL 2022 : पोलार्ड मागे फिरला असता तर... कृणालच्या कृत्यावर मुंबईचा खेळाडू भडकला

Photo-IPL

Photo-IPL

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) हे दोन्ही खेळाडू खूपच चांगले मित्र आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत हे दोघं मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमचा महत्त्वाचा भाग होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) हे दोन्ही खेळाडू खूपच चांगले मित्र आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत हे दोघं मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमचा महत्त्वाचा भाग होते, पण या आयपीएलआधी (IPL 2022) मुंबईने पोलार्डला रिटेन केलं, तर कृणाल पांड्याला रिलीज केलं. लिलावामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सनी कृणालला विकत घेतलं, यानंतर रविवारी पोलार्ड आणि कृणाल एकमेकांसमोर (MI vs LSG) आले. या सामन्यात दोघांनी एकमेकांची विकेट घेतली. पहिले बॅटिंग करणाऱ्या लखनऊने केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या मदतीने 168 रन केले, पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 132/8 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे त्यांचा 36 रनने पराभव झाला. आयपीएलच्या या मोसमातला मुंबईचा हा लागोपाठ आठवा पराभव आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमधलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. कायरन पोलार्डची विकेट घेतल्यानंतर कृणाल पांड्याने केलेल्या कृत्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कृणालच्या या कृतीवर टीका होत आहे. पोलार्डची विकेट घेतल्यानंतर कृणालने त्याला पकडलं आणि डोक्यावर किस केलं. मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आणि सध्या टीमचा टॅलेंट स्काऊट असलेल्या पार्थिव पटेलने (Parthiv Patel) कृणालवर टीका केली आहे. ‘कृणालचं ते सेलिब्रेशन जरा जास्तच होतं, खासकरून पोलार्डची कामगिरी निराशाजनक होत असताना. कृणाल आणि पोलार्ड चांगले मित्र आहेत, पण मैदानात गोष्टी वेगळ्या असतात. पोलार्ड रन करत नाहीये, तसंच मुंबईचा देखील वारंवार पराभव होत आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला वेगळं सोडणं महत्त्वाचं असतं. ड्रेसिंग रूममध्ये तुम्ही एकमेकांची खिल्ली उडवा, पण हे सेलिब्रेशन अतीच होतं,’ असं पार्थिव क्रिकबझशी बोलताना म्हणाला. कॉमेंट्री करत असताना सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही कृणालच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती. मुंबई इंडियन्सकडून खेळलेला डावखुरा फास्ट बॉलर आरपी सिंग यानेही यावरून कृणालवर निशाणा साधला. ‘कोणालाच पराभव झालेला आवडत नाही. जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नसतो, तेव्हा अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. तो कोणत्या भावनांमधून जात आहे, तुम्हाला माहिती नसतं. पोलार्ड मागे फिरला असता आणि त्याने प्रतिक्रिया दिली असती, तर काय झालं असतं? टीमला न जिंकवताच पॅव्हेलियनमध्ये जात असल्यामुळे पोलार्ड निराश होता, ते सेलिब्रेशन प्रमाणापेक्षा जास्त होतं,’ असं आरपी सिंग (RP Singh) म्हणाला. मॅच संपल्यानंतर कृणालने पोलार्डच्या विकेटबाबत प्रतिक्रिया दिली. मला त्याची विकेट मिळाली बरं झालं, नाहीतर त्याने मला आयुष्यभर मी तुझी विकेट घेतली हे ऐकवलं असतं. आता निदान तो कमी बोलेल, असं वक्तव्य कृणालने केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात