मुंबई, 2 मे: धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. सीएसकेचा या आयपीएल सिझनमधील हा तिसरा विजय आहे. या विजयानंतर क्रिकेट जगतातून धोनी आणि सीएसके संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच माजी खेळाडू सुरेश रैनाच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सीएसकेच्या विजयानंतर मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनानेही आपली प्रतिक्रिया दिली. रैनाने ट्विट करून विजयाचे हिरो ठरलेल्या काही खेळाडूंची नावेही घेतली. पण पुन्हा एकदा तो धोनीबद्दल काहीच बोलला नाही. रैनाने आपल्या ट्विटमध्ये ‘दोन्ही संघांची शानदार कामगिरी आणि शेवटी सीएसकेचा शानदार विजय. ऋतुराज आणि कॉनवे यांनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. या अतुलनीय विजयासाठी संपूर्ण संघाचे अभिनंदन!’ असे म्हटले.
Brilliant performance showcased by both the teams and a very well deserved victory for @ChennaiIPL ❤️. Exceptional performance and partnership by @Ruutu1331 & Conway. Congratulations to the whole team on such an incredible win! #CSKvsSRH #IPL2022
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 1, 2022
मात्र, त्याने ट्विटमध्ये धोनीच्या नावाचा उल्लेख न केल्याने त्याच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रैनाच्या या कृतीमुळे क्रिकेट जगतात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तो धोनीवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. रैनाला रिटेन केले नाही सीएसकेच्या सर्व विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुरेश रैनाला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी या संघाने रिटेन केले नव्हते. पण लिलावात सीएसके रैनाला विकत घेईल अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. पण घडले उलटेच आणि या चॅम्पियन संघाने आपल्या सर्वात भरवशाच्या खेळाडूकडे ढुंकूनही पाहिले नाही. सुरेश रैना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळत नाहीये. रैनाने लिलावात आपले बक्षीस 2 कोटी रुपये ठेवले होते. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते आयपीएलच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत, त्याने प्रत्येक हंगामात जबरदस्त ताकद दाखवली आहे. सुरेश रैना देखील या फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या सत्रापासून सीएसकेकडून खेळत असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. दरम्यान, हा खेळाडू गुजरात लायन्सचा 2 हंगाम कर्णधारही होता. रैनाने आपल्या कारकिर्दीत एकूण 205 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 5528 धावा केल्या आहेत. रैनाने 1 शतकासह 39 अर्धशतके झळकावली.