Home /News /sport /

IPL 2022 : SRH च्या पराभवात NO BALL चा वाटा, टीम इंडियाच्या बॉलरकडून मोठी चूक

IPL 2022 : SRH च्या पराभवात NO BALL चा वाटा, टीम इंडियाच्या बॉलरकडून मोठी चूक

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमातही सनरायजर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) ची सुरूवात निराशाजनक झाली. हैदराबादच्या या पराभवात टीम इंडियाच्या बॉलरनं टाकलेल्या 'नो बॉल' चाही मोठा वाटा होता.

    मुंबई, 30 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमातही सनरायजर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) ची सुरूवात निराशाजनक झाली. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) त्यांचा पहिल्याच मॅचमध्ये 61 रननं मोठा पराभव केला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या राजस्थाननं आक्रमक खेळ करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 210 रन केले.  हैदराबादला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 149 रनच करू शकली. राजस्थानच्या मोठ्या धावसंख्येत हैदराबादकडून खेळणारा टीम इंडियाचा प्रमुख बॉलर भुवनेश्वरकुमारच्या (Bhuvneshwar Kumar) चुकीचा मोठा वाटा होता. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये जोस बटलर (Jos Buttler) शून्यावर आऊट केले होते.  भुवनेश्वरचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल बटलरच्या बॅटला लागला. स्लिपमधील अब्दुल समदनं चांगला कॅचही पकडला. बटलर आऊट झाल्यानं हैदराबादची टीम सेलिब्रेशन करू लागली होती. पण, थर्ड अंपायरनं त्यांना थांबवलं. भुवनेश्वरनं टाकलेल्या नो बॉलवर बटलर आऊट झाला होता. बटलर त्यावेळी शून्यावर खेळत होता. तो पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाला असता तर कदाचित मॅचचं चित्र वेगळं ठरलं असतं. पण, तसं झालं नाही. भुवनेश्वरच्या या चुकीचा मोठा फटका हैदराबादला बसला. फ्री हिटवर कॅच आऊट हैदराबादकडून खेळणारा टीम इंडियाचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरनं पाचव्या ओव्हरमध्ये एक नो बॉल टाकला. त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरील फ्री हिटवरही बटलर कॅच आऊट झाला होता. पण, तिथंही तो सुदैवी ठरला. अखेर बटलर 28 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्ससह 35 रन काढून आऊट झाला. त्यानं आऊट होण्यापूर्वी राजस्थानला आक्रमक सुरूवात करून दिली होती. घरच्या मैदानात पाकिस्तानची लाज गेली, ऑस्ट्रेलियानं केला सर्वात मोठा पराभव हैदराबादच्या नावावर या सामन्यात लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली. आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये हैदराबादने सगळ्यात कमी रन केल्या. या सामन्यात पहिल्या 6 ओव्हरमध्ये हैदराबादला 3 विकेट गमावून फक्त 14 रन करता आल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, Sunrisers hyderabad

    पुढील बातम्या