मुंबई, 28 एप्रिल : आयपीएल 2022 मधल्या (IPL 2022) सगळ्यात रोमांचक सामन्याचा अनुभव क्रिकेट रसिकांना बघायला मिळाला. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (SRH vs Gujarat Titans) सनसनाटी विजय झाला. शेवटच्या ओव्हरला 22 रनची गरज असताना राशिद खानने (Rashid Khan) वादळी खेळी करत गुजरातला जिंकवून दिलं. 20 व्या ओव्हरमध्ये मार्को जेनसनच्या पहिल्या बॉलला राहुल तेवातियाने (Rahul Tewatia) सिक्स मारल्यावर दुसऱ्या बॉलला एक रन काढून राशिद खानला स्ट्राईक दिली. यानंतर राशिदने 3 सिक्स मारून गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरातला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 35 रन हवे होते, तरीही हैदराबादला हा सामना जिंकता आला नाही. हैदराबादची ही बॉलिंग बघून टीमचा स्पिन बॉलिंग कोच मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) चांगलाच भडकला. डग आऊटमध्ये बसलेल्या मुरलीधरनचं हे रौद्ररुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुरलीधरन सारख्या शांत माणसाला आपण पहिल्यांदाच असं भडकल्याचं पाहिलं आहे, असं कॉमेंटेटरही म्हणाले.
This is the Rare Moment's we saw In IPL 🤣🤣 pic.twitter.com/IKQp5BmdqF
— STRANGER 😎 (@im_Stranger77) April 27, 2022
Murali getting Angry during the 20 th over pic.twitter.com/jvcjVh4Kpp
— Kaveen (@Kaveen0724) April 27, 2022
Never seen Murali this angry lol https://t.co/axLGN2UMOJ
— yang goi (@GongR1ght) April 27, 2022
हैदराबादने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली. ऋद्धीमान साहाने 38 बॉलमध्ये 68 रन केले, तर गिलने 22 रनची खेळी करून साहाला साथ दिली. राहुल तेवातियाने 21 बॉलमध्ये नाबाद 40 आणि राशिद खानने 21 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. गुजरात टॉपवर हैदराबादविरुद्धच्या या विजयासह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या मोसमात गुजरातने 8 पैकी 7 मॅच जिंकल्या असून फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर हैदराबादची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.