जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : लिलावाच्या तीनच दिवसात KKR ने केली कॅप्टनची घोषणा, हा असणार शाहरुखचा नवा बाजीगर!

IPL 2022 : लिलावाच्या तीनच दिवसात KKR ने केली कॅप्टनची घोषणा, हा असणार शाहरुखचा नवा बाजीगर!

IPL 2022 : लिलावाच्या तीनच दिवसात KKR ने केली कॅप्टनची घोषणा, हा असणार शाहरुखचा नवा बाजीगर!

आयपीएल 2022 साठीचा (IPL Auction 2022) लिलाव शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये 10 टीमनी खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. आयपीएल लिलावाच्या दोनच दिवसांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : आयपीएल 2022 साठीचा (IPL Auction 2022) लिलाव शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये 10 टीमनी खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. आयपीएल लिलावाच्या दोनच दिवसांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे केकेआरने टीमचं नेतृत्व दिलं आहे. सोशल मीडियावरून केकेआरने याची अधिकृत घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर हा केकेआरचा सहावा कर्णधार असणार आहे. याआधी सौरव गांगुली, ब्रॅण्डन मॅक्कलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इयन मॉर्गन हे केकेआरचे कर्णधार होते. यातल्या गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरला दोन ट्रॉफी जिंकता आल्या. मागच्या मोसमापर्यंत इयन मॉर्गन टीमचा कर्णधार होता. मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकाता फायनलमध्ये पोहचली होती, यंदा मात्र टीमने मॉर्गनला रिटेनही केलं नाही आणि लिलावात विकतही घेतलं नाही. गौतम गंभीरनंतर दिनेश कार्तिककडे केकेआरचं नेतृत्व देण्यात आलं, पण आयपीएल 2020 च्या मध्यातच कार्तिकची कॅप्टन्सी काढून मॉर्गनला देण्यात आली. आता श्रेयस अय्यरपुढे कोलकात्याला तिसरी ट्रॉफी जिंकवून द्यायचं आव्हान असेल.

जाहिरात

आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता, पण आयपीएलआधी त्याला दुखापत झाली त्यामुळे तो स्पर्धेचा पहिला राऊंड खेळू शकला नाही. अय्यरऐवजी ऋषभ पंतला टीमचं नेतृत्व देण्यात आलं. दुसऱ्या राऊंडसाठी जेव्हा श्रेयस अय्यर टीममध्ये परत आला तेव्हादेखील पंतकडेच टीमचं नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय दिल्लीच्या टीमने घेतला. यानंतर दुसऱ्या टीमचा कॅप्टन होण्यासाठी अय्यरने दिल्लीची साथ सोडली. श्रेयस अय्यरची कॅप्टन व्हायची ही इच्छा आता केकेआरने पूर्ण केली आहे. श्रेयस अय्यरला कोलकात्याने लिलावामध्ये 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. केकेआरची टीम श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिंस, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, अजिंक्य रहाणे, एलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्स,मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, टीम साउदी, उमेश यादव, रिंकू सिंग, अनुकूल राय, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन, बाबा इंद्रजीत, अभिजीत तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, रमेश कुमार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात