मुंबई, 30 मार्च : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने 2008 च्या आयपीएलच्या (IPL) पहिल्या मोसमाची आठवण सांगितली आहे. आयपीएलमध्ये त्या एकाच वर्षी पाकिस्तानचे क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्या मोसमात शोएब अख्तर शाहरुख खानच्या मालकीची टीम कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळला होता. पहिल्या मोसमात सौरव गांगुली (Sourav Ganguly) केकेआरचा कर्णधार होता तर जॉन बुकानन मुख्य प्रशिक्षक होते. शोएब अख्तरने त्याच्या आयपीएल पदार्पणाचा एक किस्सा सांगितला आहे. शोएब अख्तर मॅच खेळण्यासाठी फिट नाही, असं बुकानन यांना वाटत असल्याचं शोएबने सांगितलं. ’ मी केकआरच्या टीममध्ये सामील झालो, पण मला खेळायला मिळत नव्हतं. जॉन बुकानन सौरव गांगुलीला म्हणाला शोएब फिट आहे, असं मला वाटत नाही. त्यावर शोएब अनफिट असला तरी चिंता करू नकोस, तो अर्धा अनफिटही चालून जाईल, असं गांगुलीने बुकाननला सांगितलं,’ अशी आठवण शोएब अख्तरने सांगितली. 8 मॅच पाहावी लागली वाट रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरला आयपीएल पदार्पणासाठी 8 मॅच वाट पाहावी लागली, यानंतर त्याने दिल्ली डेयरडेव्हिल्सविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात शोएबने भेदक बॉलिंग करत 11 रन देऊन 4 विकेट घेतल्या. शोएबच्या या स्पेलमुळे दिल्लीची टीम फक्त 110 रनवर ऑल आऊट झाली. या सामन्यात केकेआरचा 23 रनने विजय झाला. शोएबने वीरेंद्र सेहवाग, एबी डिव्हिलियर्स, मनोज तिवारी आणि गौतम गंभीर या दिग्गजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. शोएब मॅन ऑफ द मॅच पहिल्याच सामन्यात धमाकेदार बॉलिंग केल्याबद्दल शोएबला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. टीमचा मालक शाहरुखने शोएबला गोल्डन हेल्मेट दिलं. पहिल्या मोसमाआधी झालेल्या लिलावात केकेआरने शोएबला 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्या मोसमात शोएबने 3 मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.