Home /News /sport /

हा भारताचा डेथ ओव्हर्सचा सर्वोत्तम गोलंदाज, RCB च्या बॉलरचं सचिनकडून कौतुक

हा भारताचा डेथ ओव्हर्सचा सर्वोत्तम गोलंदाज, RCB च्या बॉलरचं सचिनकडून कौतुक

IPL 2022: आयपीएलच्या एका सामन्यात पंजाब किंग्जने 9 गडी गमावून 209 धावा केल्या होत्या. पण, आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली.

    मुंबई, 14 मे : आयपीएल 2022 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 54 धावांनी पराभव केला. या विजयामुळे पंजाबची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा जीवंत राहिली आहे. या सामन्यात (RCB vs PBKS) पंजाबने प्रथम खेळताना 9 गडी गमावून 209 धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 9 बाद 155 धावाच करू शकला. मात्र, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) बंगळुरूसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 38 धावा दिल्या आणि 4 बळीही घेतले. अनेक दिग्गजांनी यापूर्वीच हर्षल पटेलला डेथ ओव्हर्समधील स्पेशलिस्ट म्हणून गौरवलं आहे. आता सचिन तेंडुलकरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, पंजाबचा संघ 209 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही, त्यामागे एकच कारण हर्षल पटेल आहे. दिवसेंदिवस त्याच्या गोलंदाजीत सुधारणा होत आहे आणि तो आपली विविधता वाढवत आहे. तो म्हणाला की भारताच्या डेथ ओव्हर्समध्ये तो एक चांगला गोलंदाज आहे. जेव्हा फलंदाज धावा काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो त्यांना रोखण्यात यशस्वी होतो. हर्षलने 20व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या. एवढेच नाही तर या षटकात 3 विकेट्सही पडल्या. अंबाती रायडूने अचानक IPL मधून निवृत्ती होण्याचं ट्विट का केलं? CSK ने उलगडलं रहस्य मयंक अग्रवालही कमी धावांवर बोलला सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालनेही मैदानाकडे बघता आम्ही 15 ते 20 धावा कमी केल्याचं सांगितलं. सचिन तेंडुलकरने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो यांचेही कौतुक केले. तो म्हणाला की लिव्हिंगस्टोनच्या बॅटचा वेग आणि बॅकलिफ्ट अविश्वसनीय आहे. तो केवळ मोठमोठे षटकार मारत होता असे नाही, तर त्याचा अनुभवही मोठा आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाने 150 च्या स्ट्राईक रेटने खेळणे आणि शेवटपर्यंत फलंदाजी करणे अपेक्षित होते, जे त्याने केले. त्यामुळे पंजाबच्या संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. इंग्लंडचा आक्रमक फलंदाज लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. यापूर्वी त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 10 चेंडूत 30 धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. एवढेच नाही तर त्याने मोहम्मद शमीच्या चेंडूवर 117 मीटरचा षटकारही मारला. चालू हंगामातील हा सर्वात मोठा षटकार आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ipl 2022, Sachin tendulaker

    पुढील बातम्या