मुंबई, 14 मे : चेन्नई सुपर किंग्ज
(CSK) मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने
(Ambati Rayudu) शनिवारी इंडियन प्रीमियर लीग
(IPL) मधून निवृत्ती जाहीर केली. या अचानक निर्णयामुळे अंबाती रायडूचे चाहतेही हैराण झाले आहेत. काहींनी त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि त्याच्याशी संबंधित आठवणींच्या पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. परंतु, नंतर रायडूने त्याचे ट्विट हटवले. या संदर्भात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, रायडू अद्याप आयपीएलमधून निवृत्त होत नाहीये.
अंबाती रायडूने लिहिले, 'मी आनंदाने घोषणा करतो की हा (IPL-2022) माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. मी गेल्या 13 वर्षांत 2 महान संघांसोबत राहिलो. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आभार.'' नंतर त्याने हे ट्विट डिलीट केले. आतापर्यंत रायडूने याबाबत काहीही सांगितलेले नाही. पण, चेन्नई संघाच्या सीईओने सांगितले की, हा क्रिकेटपटू संघाच्या खराब कामगिरीमुळे निराश झाला आहे.
काशी विश्वनाथन यांनी स्पोर्ट्सस्टारला सांगितले की, 'मी त्याच्याशी (अंबाती) बोललो आणि तो निवृत्त होत नाही. तो त्याच्या कामगिरीने निराश झाला होता आणि म्हणूनच त्याने ते ट्विट केले. पण, त्याने ते डिलीट केले आहे. या मोसमानंतर तो नक्कीच निवृत्त होणार नाही.
रायुडू रॉक चाहते शॉक! अंबातीचा 2 तासांत निवृत्तीच्या निर्णयावर यू टर्न! ट्विट केलं डिलीट
रायुडूने अचानक निवृत्ती जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याला संघाचा भाग बनवण्यात आले नसतानाही त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु, नंतर तो देखील बदलला आणि आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परतला.
देशाची लोकसंख्या 30 हजार, पण या पठ्ठ्यांनी T20 क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड!
36 वर्षीय रायुडूने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 187 सामने खेळले असून 1 शतक, 22 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 4187 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने भारतासाठी 55 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकांसह एकूण 1694 धावा केल्या आहेत, तर त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये केवळ 42 धावा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.