मुंबई, 1 डिसेंबर: आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा न जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) पुन्हा एकदा विराट कोहलीवर (Virat Kohli) विश्वास दाखवला आहे. विराट आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून आरसीबी चा (RCB) सदस्य आहे. तो या सिझनपर्यंत (IPL 2021) आरसीबीचा कॅप्टन देखील होता. त्यानं आता कॅप्टनसी सोडली आहे. पण एक खेळाडू म्हणून त्याला 15 कोटी रूपये मोजून आरसीबीनं करारबद्ध केले आहे. आरसीबीनं रिटेन केल्यानंतर विराट कोहलीनं त्याचा बेस्ट कालावधी अजून येणार असल्याचा इशारा प्रतिस्पर्धी टीमना दिला आहे. ‘RCB सोबतचा माझा प्रवास यापुढेही सुरू राहणार असल्याचा मला आनंद आहे. मी पुढील 3 वर्ष या फ्रँचायझीसाठी खेळणार आहे. माझा बेस्ट कालावधी अजून बाकी आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. एक खेळाडू म्हणून सध्या मला चांगल्या फिलिंग्स येत आहेत.
“The amazing journey at RCB continues. 3 more years with this franchise that means so much to me. I believe the best is yet to come.” - @imVkohli
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) December 1, 2021
We and the RCB fans love you too, King Kohli. ❤️#PlayBold #WeAreChallengers #IPLRetention pic.twitter.com/63rkMcPcCO
आमच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. मी तुम्हाला खूश करेल अशीा आशा आहे. RCB च्या फॅन्सबद्दल माझ्या मनात आदर आहे,’ असेही विराटने सांगितले. आयपीएलमधील 14 पैकी 9 सिझनमध्ये विराट आरसीबीचा कॅप्टन होता. त्याने एकूण 140 मॅचमध्ये टीमची कॅप्टनसी केली आहे. मात्र आरसीबीला विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे. IPL 2022 Retention मधील 10 मोठ्या गोष्टी, ‘हे’ वाचल्यानंतर समजेल संपूर्ण रिटेन्शन आरसीबीने तीन खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांना विराट कोहलीला 15 कोटी रुपये, ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी रुपये आणि मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तर देवदत्त पडिक्कल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलला रिटेन केलेलं नाही. आयपीएल नियमानुसार प्रत्येक टीमला 4 खेळाडू रिटेन करण्याची संधी असतानाही आरसीबीने तिघांचीच निवड केली आहे.