मुंबई, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 पूर्वी कोणते खेळाडू रिटेन होणार याची उत्सुरकता आता संपली आहे. प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. पण प्रत्यक्षात 4 टीमनी ही कमाल मर्यादा पूर्ण केली आहे. 3 टीमनी प्रत्येकी तीन खेळाडू रिटेन केले असून पंजाब किंग्जनं 2 खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यामुळे एकूण 27 खेळाडू आगामी मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) नसतील हे आता स्पष्ट झाले आहे. या रिटेन्शनमधील 10 प्रमुख गोष्टी कोणत्या आहेत हे पाहूया
आयपीएल 2022 साठी बनवलेल्या नियमांनुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि एक परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार होतं. या नियमांमुळे बहुतेक दिग्गजांना पुन्हा एकदा लिलावात जावं लागणार आहे.
IPL 2022: जम्मू काश्मीरचे 2 खेळाडू रातोरात करोडपती, दिग्गजांना मागं टाकत मारली बाजी
ज्या खेळाडूंना त्यांच्या टीमनी बाहेरचा रस्ता दाखवला यांच्यातल्या बहुतेक जणांनी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्समधल्या पांड्या बंधू आणि ईशान किशनचा, आरसीबीच्या युझवेंद्र चहल आणि या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction