नवी दिल्ली, 2 डिसेंबर: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) अखेर "चॅप्टर क्लोस्ड" म्हणत संघाला राम राम ठोकला आहे. त्याने ही माहिती आपल्या सोशल अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे.
दोन दिवसांपूर्वी वॉर्नरने चाहत्याच्या एका प्रश्नाला प्रतिउत्तर देत संघातून कायमचे बाहेर पडण्याचे संकेच दिले होते. मंगळवारी आठ संघांनी आपल्या रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये 27 खेळाडूंचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसन (14 कोटी रुपये), उमरान मलिक (4 कोटी रुपये) आणि अब्दुल समद (4 कोटी रुपये) यांना रिटेन केले आहे.
त्यानंतर सर्वांच्या नजरा वॉर्नरच्या सोशल अकाऊंटकडे वळल्या. संघाने त्याला रिलीज केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली. "चॅप्टर क्लोस्ड!! सनरायझर्स हैदराबाद आणि सर्व फॅन्सचे इतकी वर्षे पाठिंबा दिल्याबद्दल आभार," असे ट्वीट वॉर्नरने केले आहे.
Chapter closed!! Thanks to all of the fans @srhfansofficial @sunrisersfansofficial for your support over all the years, it was was much appreciated. #fans #loyal https://t.co/P13ztBcBQH
— David Warner (@davidwarner31) December 1, 2021
"चॅप्टर क्लोस्ड!! त्याने केलेल्या या दोन शब्दातच त्याची संघाबाबत असलेली भावना स्पष्ट झाली आहे.
डेविड वॉर्नरचा यंदाचा आयपीएलचा हा हंगाम चांगला राहिला नाही. त्याने एक कर्णधार म्हणून सुरूवात केली होती मात्र सातत्याच्या पराभवामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्या जागी केन विल्यमसन्सला कर्णधार बनवण्यात आले. यानंतर वॉर्नरला प्लेईंग इलेव्हनमधूनही बाहेर टाकण्यात आले. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातच सनरायजर्स हैदराबादने 2016 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकला होता.
वॉर्नरनं हैदराबादसाठी खेळताना 95 डावांमध्ये 49.56 च्या सरासरीनं 4014 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 142.59 इतका होता. तीन वेळा ऑरेंज कॅप मिळवणारा तो एकमेव फलंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: David warner, Ipl 2021 auction, Ipl 2022, SRH