Home /News /sport /

IPL 2022 : विराटला इतिहास बदलण्याची संधी, नॉकआऊट पंच देणार किंग Kohli?

IPL 2022 : विराटला इतिहास बदलण्याची संधी, नॉकआऊट पंच देणार किंग Kohli?

आयपीएल 2022 चा एलिमिनेटर (IPL 2022 Eliminator) सामना आज लखनऊ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Lucknow Super Giants vs RCB) यांच्यात होणार आहे. या सामन्यात क्रिकेट रसिकांचं लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मवर असेल.

    कोलकाता, 25 मे : आयपीएल 2022 चा एलिमिनेटर (IPL 2022 Eliminator) सामना आज लखनऊ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Lucknow Super Giants vs RCB) यांच्यात होणार आहे. या दोन्ही टीमसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पराभूत झालेल्या टीमचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल, तर जिंकलेली टीम राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल. आरसीबी आणि लखनऊ यांच्यात होणाऱ्या या सामन्यात क्रिकेट रसिकांचं लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मवर असेल. आयपीएलच्या या मोसमात विराट कोहलीला संघर्ष करावा लागला, पण मागच्या काही सामन्यांमध्ये विराटला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. आयपीएलच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये मात्र विराट फार यशस्वी ठरला नाही. हा इतिहास बदलण्यासाठी विराट आज मैदानात उतरेल. आरसीबी आयपीएलमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे, पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी या मोसमात खेळत आहे. त्यांनी लीग स्टेजमध्ये 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. 16 पॉईंट्ससह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली. नॉकआऊटमध्ये विराट विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 220 मॅचच्या 212 इनिंगमध्ये त्याने 6,519 रन केले, यात त्याने 5 शतकंही केली आहेत. आयपीएलमधला त्याचा सर्वाधिक स्कोअर 113 रन आहे. नॉकआऊटमध्ये मात्र विराटला संघर्ष करावा लागला आहे. आयपीएल नॉकआऊटमधली विराटची कामगिरी आयपीएल 2009 सेमी फायनल- नाबाद 24 रन आयपीएल 2010 सेमी फायनल- 9 रन आयपीएल 2011 फर्स्ट क्वालिफायिंग फायनल - नाबाद 70 रन आयपीएल 2011 सेकंड क्वालिफायिंग फायनल- 8 रन आयपीएल 2015 एलिमिनेटर- 12 रन आयपीएल 2015 सेकंड क्वालिफायर- 12 रन आयपीएल 2016 फर्स्ट क्वालिफायर- 0 रन आयपीएल 2020 एलिमिनेटर- 6 रन आयपीएल 2021 एलिमिनेटर- 39 रन
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या