Home /News /sport /

IPL 2022 : 'उडता मॅक्सी', डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

IPL 2022 : 'उडता मॅक्सी', डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell Catch) शुभमन गिलचा (Shubhaman Gill) अफलातून कॅच पकडला.

    मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off) रेसमध्ये कायम राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya)  टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर 38 रनवर गुजरातने ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. आरसीबीने लीग स्टेजच्या 13 सामन्यांमध्ये 7 विजय तर गुजरातने 13 मॅचमध्ये 10 विजय मिळवले आहेत. दोन्ही टीमसाठी लीग स्टेजची ही शेवटची मॅच आहे. पहिले बॅटिंगला उतरलेल्या गुजरातची सुरूवात खराब झाली. ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) 4 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला. इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये जॉश हेजलवूडने गिलची विकेट घेतली, पण ही विकेट हेजलवूडची कमी आणि मॅक्सवेलची (Glenn Maxwell) जास्त होती. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या मॅक्सवेलने हवेत उडी मारून एका हातामध्ये गिलचा कॅच घेतला. आरसीबीसाठी ही विकेट महत्त्वाची होती, कारण या मोसमात गिलने 400 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. मॅक्सवेलने अफलातून कॅच घेतल्यानंतर विराटने (Virat Kohli) त्याला मिठी मारली. या भन्नाट कॅचनंतर मॅक्सवेल एक विकेटही घेतली. मॅथ्यू वेडला त्याने एलबीडब्ल्यू केलं. 13 बॉलमध्ये 2 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने त्याने 16 रन केले. मॅक्सवेलने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 1 विकेट घेतली, यामध्ये एका मेडन ओव्हरचा समावेश होता. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या 2 टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स, सीएसके आणि केकेआर या तीन टीम प्ले-ऑफमधून बाहेर झाल्या आहेत. या सामन्यात आरसीबीचा विजय झाला तर पंजाब किंग्स आणि हैदराबादही या रेसमधून बाहेर जातील. मग आरसीबी, दिल्ली आणि राजस्थान यांच्यात उरलेल्या दोन स्थानांसाठी स्पर्धा असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Glenn maxwell, Gujarat Titans, Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या