आयपीएल 2022 नंतर (IPL 2022) लगेचच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे, यानंतर लगेच भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी टीमची निवड झाली आहे.
मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 नंतर (IPL 2022) लगेचच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे, यानंतर लगेच भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी टीमची निवड झाली आहे. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे, तर काहींनी टीम इंडियातलं त्यांचं स्थान गमावलं आहे. आयपीएलमधला पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याची दोन्ही टीममध्ये निवड झालेली नाही.
आयपीएल 2022 मध्ये मयंक अग्रवालची कामगिरी निराशाजनक झाली. 12 सामन्यांमध्ये त्याने 16.33 च्या सरासरीने फक्त 196 रन केले. या कारणामुळे त्याला टीम इंडियातलं स्थानही गमवावं लागलं. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी याबाबत त्यांचं परखड मत मांडलं आहे.
'रवींद्र जडेजा आणि मयंक अग्रवाल एकाच जहाजात आहेत. ज्यांनी आयुष्यात कधीच कॅप्टन्सी केली नाही, त्यांना तुम्ही फ्रॅन्चायजीचे कॅप्टन बनवता,' असं म्हणत शास्त्रींनी पंजाब किंग्सवरच अप्रत्यक्ष निशाणा साधला.
'मला मयंकबद्दल अनादर नाही, मला तो आवडतो. तो कसा क्रिकेट खेळतो आणि तो किती निश्चयी आहे, हे मला माहिती आहे, पण तुम्ही त्या व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी ठेवलं आहे, ज्यामुळे अडचणी निर्माण होतात. अतीशय गंभीर अडचणी, याचे परिणामही गंभीर होतील. या सगळ्यामुळे मयंक टीम इंडियातलं स्थान गमावून बसेल. टेस्ट टीममधलंही. कारण निवड समिती सध्याच्या फॉर्मवर खेळाडूंची निवड करते', असं शास्त्री म्हणाले. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या शोमध्ये रवी शास्त्री बोलत होते.
केएल राहुलने पंजाब किंग्सची साथ सोडल्यानंतर टीमने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना रिटेन केलं आणि मयंक अग्रवालला टीमचं कर्णधार करण्यात आलं. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सचं प्ले-ऑफचं स्थान थोडक्यात हुकलं. पंजाबने 14 मॅचमध्ये 7 मॅच जिंकल्या आणि 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. आणखी एका मॅचमध्ये विजय झाला असता, तर पंजाब किंग्स प्ले-ऑफमध्ये पोहोचली असती. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर राहिली.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.