मुंबई, 31 मे : कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंसाठी वेडे असलेले चाहते आपण अनेकवेळा पाहतो. खेळाडूंसाठी हे चाहते अगदी काहीही करायला तयार असतात. हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya Fan) बिहारमधला चाहताही त्याचं प्रेम असंच दाखवत आहे. बिहारच्या रवी पांड्याने आपल्या आडनावामध्येही हार्दिकचं आडनाव लावलं आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) विजय झाल्यानंतर रवी इतका खूश झाला की त्याने आपल्या सलूनमध्ये एक दिवस फ्री सेवा द्यायचा निर्णय घेतला. रवी सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांची हेयर कटिंग आणि दाढी फुकटात करत आहे.
बिहारच्या नवादामध्ये अकौना रोडवर रवीचं सलून आहे. गुजरात आपली आवडती टीम आहे, कारण हार्दिक पांड्या त्यांचा कॅप्टन आहे, असं रवीने सांगितलं. गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर रवीने सोशल मीडियावर सलूनमध्ये एक दिवस फ्री सेवा देणार असल्याची घोषणा केली, यानंतर त्याच्या पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दी व्हायला सुरूवात झाली.
रवीने आपलं दुकान आणि आजूबाजूला पोस्टर लावून याची जाहिरात केली. रवीच्या दुकानात बहुतेकवेळा ठरलेले ग्राहक येतात, पण या जाहिरातीनंतर नवे ग्राहकही त्याच्या दुकानाकडे वळले. रवीनेही कोणत्याच ग्राहकाला निराश केलं नाही. तसंच प्रत्येक ग्राहकाचं रेकॉर्ड राहावं, म्हणून त्याने त्यांची नावं आणि सही घेतली. याशिवाय रवीने ग्राहक आणि मित्रांना मिठाई आणि थंड प्यायला देऊन गुजरातच्या विजयाचा आनंद साजरा केला. रवीला आता हार्दिक पांड्याला भेटण्याची मनापासून इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022