Home /News /sport /

IPL 2022 : रोहित करतोय धोनी स्टाईल सराव, VIDEO पाहून विरोधी टीमना भरेल धडकी!

IPL 2022 : रोहित करतोय धोनी स्टाईल सराव, VIDEO पाहून विरोधी टीमना भरेल धडकी!

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धा आठवड्यावर आलेली असतानाच प्रत्येक टीमच्या सरावाला सुरूवात झाली आहे. आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेला रोहित शर्माही (Rohit Sharma) मैदानामध्ये घाम गाळत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 मार्च : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धा आठवड्यावर आलेली असतानाच प्रत्येक टीमच्या सरावाला सुरूवात झाली आहे. आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेला रोहित शर्माही (Rohit Sharma) मैदानामध्ये घाम गाळत आहे. रोहित शर्माच्या बॅटिंग प्रॅक्टिसचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा जोरदार तयारी करताना दिसत आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. रोहित करतोय हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस मुंबईने आपली शेवटची आयपीएल 2020 साली फायनलमध्ये दिल्लीला हरवून जिंकली. रोहितच्या टीमने 2019 आणि 2020 असे लागोपाठ दोन वर्ष आयपीएल किताब जिंकला, पण 2021 सालची टीमची कामगिरी निराशाजनक झाली. मुंबईला मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नव्हता. आयपीएलच्या या मोसमाआधी रोहित शर्मा एमएस धोनीच्या (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉटचीही (Helicopter Shot) प्रॅक्टिस करत आहे. याशिवाय त्याने नेटमध्ये लॉफ्टेड शॉट, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कटही लगावले. रोहित शर्मासाठी आयपीएलचा हा मोसम खास असणार आहे, कारण पहिल्यांदाच तो भारतीय टीमचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी उतरत आहे. कर्णधार म्हणून रोहितने भारतीय टीमच्या मोसमाचा यशस्वी अंत केला. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या तिन्ही टीमना व्हाईटवॉश केलं. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती आयपीएलमध्येही करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. रोहित शर्माने आयपीएलमध्ये 213 मॅच खेळल्या, यातल्या 208 इनिंगमध्ये त्याने 31.17 च्या सरासरीने 5,611 रन केले आहेत. रोहितच्या नावावर एक शतक आणि 40 अर्धशतकं आहेत. आयपीएलमध्ये रोहितने केकेआरविरुद्ध शतक केलं होतं. मुंबईचा यंदाच्या मोसमातला पहिला सामना 27 मार्चला दिल्लीविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या