मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वयाच्या 40 व्या वर्षीही माहीचा जलवा, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा धोनी बनला क्रमांक एकचा भारतीय

वयाच्या 40 व्या वर्षीही माहीचा जलवा, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा धोनी बनला क्रमांक एकचा भारतीय

MS Dhoni

MS Dhoni

इंडियन प्रिमियर लिग (IPL 2022) ला शनिवार (26 मार्च) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धडाक्यात सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स( KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात आयपीएलच्या 15 व्या सीझनमधील पहिला सामना खेळवण्यात आला. या पहिल्याच सामन्यात एम एस धोनीने(MS Dhoni) कमालीची खेळी करत नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 27 मार्च : इंडियन प्रिमियर लिग (IPL 2022) 2022 ला कालपासून सुरुवात झाल. यंदाच्या या 15 व्या सीझनमध्ये महेंद्र सिंह धोनी(MS Dhoni) पहिल्यांदाच एक केवळ खेळाडू म्हणूल खेळला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात आयपीएलच्या 15 व्या सीझनमधील पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सीएसकेचा संकटमोचक एमएस धोनीने शानदार फलंदाजी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. धोनीने पहिल्याच सामन्यात महत्वपूर्ण अशी 50 धावांची खेळी केली. विशेष म्हणचे हे अर्धशतक ठोकताना धोनीने स्वतःच्या नावावर एक वेगळे रेकॉर्ड केले.

चेन्नईचा संघ 83 वर 5 बाद अशा अवस्थेत असताना धोनीने वादळी खेळी खेळत 50 धावा केल्या. त्याच्या या अर्धशतकाने जसे चेन्नईला सावरले तसे खेळाडू म्हणून धोनीसाठी हे अर्धशतक खास ठरले. धोनी हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वाधिक वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे.

IPL 2022 : आयपीएलमधून BCCI आणि टीमची कमाई कशी होते? जाणून घ्या गणित

केकेआरविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या धोनीने वयाच्या 40 वर्ष 262 दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे. तसेच त्याने या यादीतील आतापर्यंतचा क्रमांक एकचा खेळाडू राहुल द्रविड आणि क्रमांक दोनचा सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे.

राहुल द्रविडने 40 वर्षे 116 दिवस वय असताना आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले होते. तर सचिन तेंडुलकर याने 39 वर्षे 362 दिवसांचा असताना अर्धशतक झळकावले होते.

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK vs KKR) 6 विकेटने पराभव केला आहे. सीएसकेने दिलेल्या 132 रनचं आव्हान केकेआरने 18.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Rahul dravid, Sachin tendulakar