जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबई इंडियन्स 0-8, आता चमत्कारही प्ले-ऑफमध्ये घेऊन जाणार नाही

IPL 2022 : मुंबई इंडियन्स 0-8, आता चमत्कारही प्ले-ऑफमध्ये घेऊन जाणार नाही

IPL 2022 : मुंबई इंडियन्स 0-8, आता चमत्कारही प्ले-ऑफमध्ये घेऊन जाणार नाही

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) लागोपाठ आठवा पराभव झाला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने (MI vs LSG) दिलेलं 169 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 132 रनच करता आल्या

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) लागोपाठ आठवा पराभव झाला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने (MI vs LSG) दिलेलं 169 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 132 रनच करता आल्या, त्यामुळे त्यांचा 36 रनने पराभव झाला. मुंबईकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) 39 आणि तिलक वर्माने (Tilak Varma) 38 रनची खेळी केली. लखनऊकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, त्याला या तिन्ही विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये मिळाल्या. कृणालशिवाय मोहसीन खान, जेसन होल्डर, रवी बिष्णोई आणि आयुष बदोणी यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर केएल राहुलच्या खणखणीत शतकाच्या जोरावर लखनऊने 20 ओव्हरमध्ये 168/6 पर्यंत मजल मारली. राहुलने 62 बॉलमध्ये नाबाद 103 रन केले, यात 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. मुंबईकडून मेरेडिथ आणि पोलार्ड यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर सॅम्स आणि बुमराह यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. लखनऊविरुद्धच्या या पराभवासोबतच मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याची अखेरची आशाही मावळली आहे. आता कोणता चमत्कारही मुंबईला प्ले-ऑफमध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. या मोसमातल्या सगळ्या 8 मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात