मुंबई, 5 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. दिल्ली आणि राजस्थान यांच्याविरुद्ध मुंबईचा पराभव झाला, त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये रोहितची टीम आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (MI vs KKR) आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचसाठी मुंबईची टीम पुण्यात दाखल झाली आहे. मुंबई इंडियन्स टीमचा मेंटर आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) पुण्यासाठी रवाना झाला, पण एक्स्प्रेस वे वरच्या ट्रॅफिकचा फटका सचिनलाही बसला. सचिनसोबत गाडीमध्ये मुंबई इंडियन्सचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे होते. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान दोघांनही मराठी गाण्यांचा आनंद घेतला. ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’, या गाण्यावर सचिन तेंडुलकर आणि किरण मोरे यांनी ताल धरला. मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा, पुण्याला करतोय ये जा, असं मजेशीर कॅप्शन सचिनने या पोस्टला दिलं. पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलो, असंही सचिन यात म्हणाला आहे.
Stuck in traffic while heading to Pune.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 5, 2022
Thought of listening to this lovely song! 🎶
मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…
पुण्याला करतोय ये जा… pic.twitter.com/jyCYKqjoPK
मुंबई आणि कोलकाता यांच्यामध्ये आतापर्यंत 29 मॅच झाल्या आहेत, यातल्या मुंबईने 22 तर कोलकात्याने फक्त 7 मॅच जिंकल्या. आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा करणाऱ्या मुंबईला केकेआरविरुद्धचं हे रेकॉर्ड नक्कीच दिलासा देणारं असेल. मुंबईची टीम रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थंपी, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अरशद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन एलन, कायरन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन