मुंबई, 6 एप्रिल : आयपीएल स्पर्धेचं सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) या सिझनमध्ये पहिल्या विजयाची अद्याप प्रतीक्षा आहे. मुंबई इंडियन्सचा पहिल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं तर दुसऱ्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं पराभव केला होता. आज (बुधवार) पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये मुंबईची लढत कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे.
केकेआरनं या सिझनमध्ये तीनपैकी दोन सामने जिंकले असून ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 2 वर आहे. केकेआरच्या यशात त्यांचा अनुभवी फास्ट बॉलर उमेश यादवचा (Umesh Yadav) निर्णायक वाटा आहे. 3 मॅचमध्ये 8 विकेट्स घेणाऱ्या उमेशच्या डोक्यावरच सध्या पर्पल कॅप आहे. ही कॅप आणखी घट्ट करण्याच्या निश्चयानं तो मुंबई विरूद्ध मैदानात उतरणार आहे.
उमेशनं पहिल्या 6 ओव्हर्सच्या 'पॉवर प्ले' मध्ये केकेआरला दमदार सुरूवात करून दिली आहे. त्यानं 8 पैकी 6 विकेट्स या 'पॉवर प्ले' मध्ये घेतल्या आहेत. उमेशनं तीन्ही मॅचमधील पॉवर प्लेमध्ये 6 पेक्षा कमी इकोनॉमी रेटनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. प्रतिस्पर्धी टीम मैदानात स्थिरावण्यापूर्वीच त्यांना धक्के देण्याचं काम उमेश करतोय. केकेआरनं मिळवलेल्या दोन्ही विजयामध्ये तोच 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराचा मानकरी होता. उमेश सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याचा सामना करण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या मुंबईच्या ओपनर्सना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) हे घातक अस्त्र 'पॉवर प्ले' मध्ये चाललं तर मुंबई इंडियन्सची अडचण वाढू शकते.
मुंबई करणार टीममध्ये बदल
पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे मुंबई इंडियन्स तिसऱ्या सामन्यासाठी टीममध्य बदल करण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फिट झाला तर अनमोलप्रितसिंगऐवजी तो थेट प्लेयिंग इलेव्हनमध्ये येईल.
टीम डेव्हिड (Tim David) आणि डॅनियल सॅम्स (Daniel Sams) या दोन खेळाडूंनाही पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये चमक दाखवता आली नाही. सॅम्सने तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 24 रन दिल्या, ज्यामुळे मुंबईला सामना गमवावा लागला. राजस्थानविरुद्ध सॅम्सने पहिल्याच बॉलला गरज नसताना मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, यात तो आऊट झाला. सॅम्सऐवजी मुंबईकडे डावखुरा स्पिन ऑलराऊंडर फॅबियन एलनचा (Fabien Allen) पर्याय आहे. बेबी एबी म्हणून ओळख मिळवलेला डेवाल्ड ब्रेविसही अजून बेंचवरच आहे.
IPL 2022 : टीमच्या दमदार प्रदर्शनामुळे नेहराजी खूश, भर मैदानातच केला डान्स! VIDEO
पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या बसील थम्पीने दुसऱ्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 26 रन दिल्या. थम्पीऐवजी अनुभवी डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला खेळवण्याचा निर्णय रोहित शर्मा घेऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.