Home /News /sport /

IPL 2022 : दिल्लीविरुद्धच्या दारूण पराभवनंतर Rohit Sharma ला बसला आणखी एक मोठा धक्का

IPL 2022 : दिल्लीविरुद्धच्या दारूण पराभवनंतर Rohit Sharma ला बसला आणखी एक मोठा धक्का

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धक्कादायक पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सच्या (MI vs DC) हाता तोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला.

    मुंबई, 27 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धक्कादायक पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सच्या (MI vs DC) हाता तोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला आणखी एक धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला (Rohit Sharma) 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमानुसार 85 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू होणं बंधनकारक आहे, पण मुंबईने निर्धारित वेळेत 20वी ओव्हर सुरू केली नाही. याआधी मागच्या मोसमापर्यंत 85 मिनिटांमध्ये प्रत्येक टीमला 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक होतं. मुंबई इंडियन्सने आता दुसऱ्यांदा जर निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण केल्या नाही तर रोहित शर्माला 24 लाखांचा दंड भरावा लागेल. तसंच तिसऱ्यांदा पुन्हा हीच चूक झाली तर 30 लाखांचा दंड आणि एका आयपीएल मॅचची बंदी घातली जाईल. मुंबईचा धक्कादायक पराभव दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा 4 विकेटने पराभव केला. ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या धमाकेदार खेळीमुळे दिल्लीने मुंबईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. ललित यादव आणि अक्षर पटेल या जोडीने 30 बॉलमध्ये 75 रनची पार्टनरशीप केली. ललित यादवने 38 बॉलमध्ये नाबाद 48 रन केले, तर अक्षर पटेलने 17 बॉलमध्ये नाबाद 38 रनची खेळी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 38 आणि शार्दुल ठाकूर 22 रन करून आऊट झाला. मुंबईने दिलेल्या 178 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था 13.2 ओव्हरमध्ये 104/6 अशी झाली होती, पण ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी मुंबईला जिंकून दिलं नाही. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 28 रनची गरज होती, पण डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) एकाच ओव्हरमध्ये तब्बल 24 रन दिले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या