Home /News /sport /

IPL2022: 'ती परत येतेय'...2 वर्षांनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार टीम इंडियाच्या खेळाडूची पत्नी

IPL2022: 'ती परत येतेय'...2 वर्षांनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार टीम इंडियाच्या खेळाडूची पत्नी

Mayanti Langer

Mayanti Langer

महिला अँकर्सपैकी लोकप्रिय असणारी मयंती लँगर (Mayanti Langer) पुन्हा चर्चेत आली आहे. ती पुन्हा क्रिकेटच्या मैदानात अँकरीग करताना दिसणार आहे. मातृत्वाची जबाबदारी निभावत असल्याने ती मागचे दोन सीजन क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. पण आता लवकरच ती आयपीएल (IPL) च्या ब्रॉडकास्टिंग टीममध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 22 मार्च: महिला अँकर्सपैकी लोकप्रिय असणारी मयंती लँगर (Mayanti Langer) पुन्हा चर्चेत आली आहे. ती पुन्हा क्रिकेटच्या मैदानात अँकरीग करताना दिसणार आहे. मातृत्वाची जबाबदारी निभावत असल्याने ती मागचे दोन सीजन क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. पण आता लवकरच ती आयपीएल (IPL) च्या ब्रॉडकास्टिंग टीममध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल 2020 च्या सीजनमध्ये मयंती दिसली नाही, त्यावेळी अनेक क्रिकेटप्रेमींच्या नजरा तिला शोधत होत्या. मात्र, तिने ट्विट करुन आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. तिने, सोशल मीडियावरुन आई झाल्याचं जाहीर केलं होतं. आता ती पुन्हा दोन वर्षानी क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. मयंती सोबत यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये संजना गणेशन, तान्या पुरोहित आणि नेरोली मीडोज यासुद्धा अँकरीग करताना दिसणार आहेत.
  टीम इंडियाच्या क्रिकेटरची पत्नी मयंती लँगर (Mayanti Langer) हिने भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी सोबत लग्न केलं आहे. मैदानावर असताच स्टुअर्ट बिन्नी आणि मयंतीची पहिली नजरानजर झाली. तिथून त्यांच्या प्रेमसंबंधांची सुरुवात झाली. 2012 मध्ये ते विवाहबद्ध झाले. दोघांची लव्हस्टोरी पूर्णपणे फिल्मी आहे. इंडियन क्रिकेट लीग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. स्टुअर्ट बिन्नीचाच तिने पहिला इंटरव्ह्यू केला होता. यंदाच्या सीजनमध्ये प्लेऑफ सह एकूण 74 मॅच खेळवण्यात येणार आहे. 26 मार्चला वानखेडे स्टेडीअममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर फायनल मॅच 29 मे ला खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात चार ठिकाणी यंदाच्या आयपीएलमधील 70 मॅच खेळवण्यात येणार आहेत. प्लेऑफ मॅचचे ठिकाण अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मुंबई च्या वानखेडे स्टेडिअममधये 20, ब्रेबोर्न स्टेडियममध्ये 15, मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियममध्ये 20 आणि पुणे के एमसीए इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये 15 मॅच अशी मॅचेसची विभागणी करण्यात आली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Cricket news, Ipl 2022

  पुढील बातम्या