मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) शनिवारपासून सुरूवात झाली. पहिलाच सामना गतविजेती चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केकेआरने सीएसकेचा अगदी सहज पराभव केला, पण या मॅचदरम्यान कॉमेंट्री करत असताना मॅथ्यू हेडनने (Mathew Hayden) वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यामुळे त्याच्यावर चाहते टीका करत आहेत. केकेआरने या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत सीएसकेचा 6 विकेटने पराभव केला. केकेआरच्या बॉलरनी चेन्नईला फक्त 131 रनमध्येच रोखलं. उमेश यादवने (Umesh Yadav) बॉलिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. उमेशने सुरूवातीलाच दिलेल्या धक्क्यांमुळे टीमला शेवटपर्यंत कमबॅक शक्य झाला नाही. टीम इंडियाकडून फक्त टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या उमेश यादवने त्याच्या स्विंग बॉलिंगने प्रभावित केलं. सीएसकेच्या दोन्ही ओपनरना त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. उमेशने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या. उमेश यादव 2020 आयपीएलमध्ये फक्त 2 मॅच खेळला, यानंतर त्याला आयपीएल 2021 मध्ये एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2022 मध्ये मात्र केकेआरने त्याला पहिल्याच सामन्यात खेळवलं आणि या सामन्यात उमेशने धमाका केला. उमेश यादवची जबरदस्त बॉलिंग बघून हिंदीमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या मॅथ्यू हेडनने वादग्रस्त वक्तव्य केलं. हेडनच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. तसंच अनेकांनी हेडनने माफी मागावी अशी मागणीही केली आहे.
Mathew Hayden: Someone else’s trash has become KKR’s treasure
— Sonali (@samtanisonali1) March 26, 2022
On Umesh Yadav. Wtf 😭😭😭😭
‘दुसऱ्या टीमसाठी कचरा असणारा उमेश यादव केकेआरसाठी खजाना ठरला,’ असं मॅथ्यू हेडन लाईव्ह कॉमेंट्री करत असताना म्हणाला. मॅथ्यू हेडन त्याच्या या वक्तव्यामुळे अडचणीत सापडला आहे.
उमेश यादवचा विक्रम सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उमेश यादवला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आयपीएलमध्ये उमेश यादवचं हे 9वे प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड आहे. आतापर्यंत कोणत्याच फास्ट बॉलरला इतकेवेळा हा पुरस्कार मिळालेला नाही.