जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : उमेशने आपल्याच बॉलिंगवर पकडला भन्नाट कॅच, पडिक्कल बघतच बसला, VIDEO

IPL 2022 : उमेशने आपल्याच बॉलिंगवर पकडला भन्नाट कॅच, पडिक्कल बघतच बसला, VIDEO

IPL 2022 : उमेशने आपल्याच बॉलिंगवर पकडला भन्नाट कॅच, पडिक्कल बघतच बसला, VIDEO

उमेश यादवने (Umesh Yadav) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत 10 मॅचमध्ये त्याने 15 विकेट घेतल्या आहेत. केकेआरचा (KKR) तो सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 मे : उमेश यादवने (Umesh Yadav) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत 10 मॅचमध्ये त्याने 15 विकेट घेतल्या आहेत. केकेआरचा (KKR) तो सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात उमेश यादवने देवदत्त पडिक्कलचा (Devdutt Padikkal) भन्नाट कॅच पकडला. आपल्याच बॉलिंगवर उमेश यादवने कॅच घेऊन पडिक्कलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 5 बॉलमध्ये 2 रन करून पडिक्कल आऊट झाला. उमेश यादवने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 1 विकेट घेतली. तर टीम साऊदीला 2, अनुकूल रॉय आणि शिवम मावी यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 152 रन करण्यात आले. कर्णधार संजू सॅमसनने 49 बॉलमध्ये सर्वाधिक 54 रन केले, तर शिमरन हेटमायरन 13 बॉलमध्ये नाबाद 27 रनची खेळी केली. उमेश यादवने या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी केकेआरला यश मिळालेलं नाही. टीमने 9 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे आता टीमसाठी करो या मरो ची स्थिती निर्माण झाली आहे. आता एकही पराभव केकेआरच्या प्ले-ऑफच्या स्वप्नांना धक्का लावेल. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर आठव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात