जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : कुलदीपच्या फिरकीपुढे KKR ची दाणादाण, दिल्लीचा दणदणीत विजय

IPL 2022 : कुलदीपच्या फिरकीपुढे KKR ची दाणादाण, दिल्लीचा दणदणीत विजय

Photo-Delhi Capitals

Photo-Delhi Capitals

कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) फिरकीपुढे केकेआरची (KKR vs Delhi Capitals) दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने कोलकात्याचा 44 रनने पराभव केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) फिरकीपुढे केकेआरची (KKR vs Delhi Capitals) दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने कोलकात्याचा 44 रनने पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा 19.4 ओव्हरमध्ये 171 रनवर ऑल आऊट झाला. कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर खलील अहमदला 3, शार्दुल ठाकूरला 2 आणि ललित यादवला 1 विकेट घेण्यात यश आलं. केकेआरकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 54 रन केले, तर नितीश राणाने 30 आणि आंद्रे रसेलने 24 रनची खेळी केली. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 215 रन केले. डेव्हिड वॉर्नरने 61 आणि पृथ्वी शॉने 29 बॉलमध्ये 51 रनची आक्रमक खेळी केली. ऋषभ पंतने 14 बॉलमध्ये 27 रन केले, याशिवाय शार्दुल ठाकूरने 11 बॉलमध्ये नाबाद 29 आणि अक्षर पटेलने 14 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले. दिल्लीविरुद्ध पराभव झाला असला तरी केकेआरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. केकेआरने 5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकात्याच्या खात्यात सध्या 6 पॉईंट्स आहेत. दुसरीकडे दिल्ली 4 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 4 पैकी 2 मॅच जिंकल्या आणि 2 मध्ये त्यांचा पराभव झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात