मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 मध्येही चाललं 'गुजरात मॉडेल', दुसऱ्या टीमही वापरणार हाच विजयी फॉर्म्युला!

IPL 2022 मध्येही चाललं 'गुजरात मॉडेल', दुसऱ्या टीमही वापरणार हाच विजयी फॉर्म्युला!

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच आपली पहिली आयपीएल खेळणाऱ्या टीमला ट्रॉफी जिंकण्यात यश आलं आहे.

अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच आपली पहिली आयपीएल खेळणाऱ्या टीमला ट्रॉफी जिंकण्यात यश आलं आहे. गुजरातच्या विजयाच्या मॉडेलकडे पाहिलं तर भविष्यात बऱ्याच टीम हाच विजयी फॉर्म्युला वापरू शकतात, ज्याने गुजरातला चॅम्पियन केलं.

मल्टी टास्किंग खेळाडू

आयपीएल 2022 साठी फेब्रुवारी महिन्यात लिलाव झाला तेव्हा बऱ्याच जणांनी गुजरातच्या टीमवर टीका केली होती, तसंच ही टीम कमजोर असल्याचं मतही व्यक्त केलं, पण गुजरातने या सगळ्यांना धक्का दिला. प्रत्येक सामन्यात टीममध्ये ऑलराऊंडर होते, तसंच ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि मॅथ्यू वेड (Mathew Wade) हे दोन विकेट कीपर वरच्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठीही सक्षम होते.

पॉवर-प्लेमध्ये संयमी बॅटिंग

पॉवर-प्लेमध्ये धमाकेदार बॅटिंग म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये यशाची गॅरंटी, असं समिकरण झालं होतं, पण गुजरातने या समिकरणाला छेद दिला. गुजरातने पॉवर-प्लेमध्ये विकेट वाचवून मधल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं.

पॉवर-प्लेमध्ये दमदार बॉलिंग

गुजरात टायटन्स पॉवर-प्लेमधली सगळ्यात यशस्वी टीम ठरली. 16 सामन्यांमध्ये गुजरातच्या बॉलर्सनी पॉवर-प्लेमध्ये 27 विकेट घेतल्या. बहुतेकवेळा गुजरातच्या फास्ट बॉलरना विरोधी टीमच्या ओपनरना सुरूवातीलाच आऊट करण्यात यश आलं. मोहम्मद शमी (Mohammad Shami) गुजरातचा सगळ्यात यशस्वी बॉलर होता, त्याने पॉवर-प्लेमध्ये 11 विकेट घेतल्या. याशिवाय लॉकी फर्ग्युसनने पॉवर-प्लेमध्ये 6 आणि यश दयाळने 5 विकेट मिळवल्या.

कर्णधाराची उत्कृष्ट कामगिरी

गुजरातचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) फायनलमध्ये हार्दिकने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या. त्याने संजू सॅमसन, जॉस बटलर आणि शेमरन हेटमायर या राजस्थानच्या तीन प्रमुख खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर बॅटिंगमध्येही हार्दिकने 34 रनची महत्त्वाची खेळी केली.

आयपीएलच्या 15 व्या मोसमात हार्दिकने बॅटिंग आणि बॉलिंगसह कॅप्टन्सीही उल्लेखनीय केली. गुजरातचा तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. हार्दिकने 15 मॅचमध्ये 44.27 च्या सरासरीने आणि 131.26 च्या स्ट्राईक रेटने 487 रन केले. याशिवाय बॉलिंगमध्ये त्याने 7.27 चा इकोनॉमी रेट आणि 27.75 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या.

नाकरलेले खेळाडू बनले हिरो

डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, लॉकी फर्ग्युसन आणि राशिद खान या खेळाडूंना त्यांच्या जुन्या टीमनी रिटेन केलं नाही, पण हेच खेळाडू गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले. डेव्हिड मिलरला तर आयपीएल लिलावाच्या पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याच टीमने विकत घेतलं नव्हतं, पण दुसऱ्या राऊंडमध्ये गुजरातने त्याच्यावर बोली लावली.

मिलर मागच्या मोसमापर्यंत राजस्थानच्या टीममध्ये होता, यावेळी मात्र त्याने क्वालिफायर 1 आणि फायनलमध्ये याच राजस्थानविरुद्ध मॅच विनिंग खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याला मुंबईने सोडून दिलं, त्याच्याऐवजी पोलार्डवर विश्वास दाखवला याचं फार मोठं नुकसान मुंबईला भोगावं लागलं. जगातला सर्वोत्तम टी-20 बॉलर असलेल्या राशिद खानला सोडण्याची चूक हैदराबादने केली. तर राजस्थानने तेवातिया आणि पंजाबने मोहम्मद शमीवर विश्वास दाखवला नाही. आयपीएलच्या इतर टीमनी नाकारलेले खेळाडूच गुजरातसाठी हिरो ठरले.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022