जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : गिलची चूक, पण बॉलरलाच दिली खुन्नस, मैदानातल्या टशनचा Live Video

IPL 2022 : गिलची चूक, पण बॉलरलाच दिली खुन्नस, मैदानातल्या टशनचा Live Video

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार कामगिरी केली आहे. टीमने 9 पैकी 8 मॅच जिंकल्या, पण मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्यात गुजरातला चांगली सुरूवात करता आली नाही. गुजरातचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) जलद रन काढण्याच्या नादात रन आऊट झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार कामगिरी केली आहे. टीमने 9 पैकी 8 मॅच जिंकल्या, पण मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्यात गुजरातला चांगली सुरूवात करता आली नाही. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, हार्दिकच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण आयपीएलमध्ये सगळेच कर्णधार टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतात. मॅच सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच ओव्हरला गुजरातचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) जलद रन काढण्याच्या नादात रन आऊट झाला. ऋषी धवनच्या डायरेक्ट हिटमुळे गिलला माघारी जावं लागलं. गुजरातची बॅटिंग सुरू असताना तिसरी ओव्हर टाकण्यासाठी पंजाबचा फास्ट बॉलर संदीप शर्मा (Sandeep Sharma) आला. पहिल्याच बॉलला गिलने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट मारला आणि तो रन धावण्यासाठी निघाला, पण ऋषी धवनने केलेला थ्रो थेट स्टम्पवर आदळला, त्यामुळे गिलला रन आऊट व्हावं लागलं. आऊट झाल्यानंतर गिल भडकलेला दिसला, कारण संदीप शर्मा समोर आल्यामुळे त्याला बाजूला होऊन पळावं लागलं, पण रिप्लेमध्ये संदीप शर्माची चूक नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. शुभमन गिलने संदीप शर्माला खुन्नसही दिली. कॉमेटंटेरनीही संदीप शर्माची चूक नसून गिलच गरज नसताना रनसाठी धावला, अशी प्रतिक्रिया दिली. शुभमन गिलला गुजरात टायटन्सनी आयपीएल लिलावाआधीच विकत घेतलं. या मोसमाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्येच गिलने 180 रन केल्या, पण नंतरच्या 7 सामन्यांमध्ये तो संघर्ष करताना दिसत आहे, कारण त्याच्या बॅटमधून फक्त 89 रनच आल्या. या मॅचमध्ये तो 6 बॉलमध्ये 9 रन करून आऊट झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात