मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : गुजरात टायटन्सचं विजयी सेलिब्रेशन, खुल्या बसमधून अहमदाबादचा प्रवास, VIDEO

IPL 2022 : गुजरात टायटन्सचं विजयी सेलिब्रेशन, खुल्या बसमधून अहमदाबादचा प्रवास, VIDEO

आयपीएल 2022 च्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली. या विजयानंतर सेलिब्रेशनसाठी गुजरातची टीम रस्त्यावर उतरली. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनीही अहमदाबादच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2022 च्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) चॅम्पियन झाली. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा 7 विकेटने पराभव केला. या विजयानंतर सेलिब्रेशनसाठी गुजरातची टीम रस्त्यावर उतरली. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनीही अहमदाबादच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातची ही पहिलीच आयपीएल होती आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांनी थेट ट्रॉफीवरच कब्जा केला. आयपीएल जिंकल्यानंतर सोमवारी टीमच्या खेळाडूंनी खुल्या बसमधून अहमदाबादचा प्रवास केला. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनीही या नव्या चॅम्पियन टीमचं स्वागत केलं आणि त्यांना सन्मानित केलं.

View this post on Instagram

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

'आयपीएल 2022 चे विजेते गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसोबत बोलण्याची संधी मिळाली. टीमच्या सगळ्या सदस्यांनी त्यांचं हस्ताक्षर असलेली बॅट मला भेट दिली, यातून मिळणारे पैसे राज्यातल्या मुलींच्या शिक्षणासाठी वापरले जातील. सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा,' असं ट्वीट गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी केलं.

अहमदाबादमधल्या या सेलिब्रेशननंतर मंगळवारी टीम मुंबईला जाणार आहे, तिकडे टीमचे मालक खेळाडूंना पार्टी देणार आहेत. आयपीएल जिंकल्यानंतर खेळाडूंनी सकाळी 3 वाजेपर्यंत पार्टी केली आणि मग हॉटेलमध्येही सेलिब्रेशन केलं. सकाळी 6 वाजता सगळे खेळाडू आपल्या रुममध्ये गेले. खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातले सदस्यही उपस्थित होते. शुभमन गिलसोबत त्याचे वडील आले होते.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022