मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हार्दिकला दिलं स्पेशल गिफ्ट, चॅम्पियन टीमची घेतली भेट

IPL 2022 : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हार्दिकला दिलं स्पेशल गिफ्ट, चॅम्पियन टीमची घेतली भेट

आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये (IPL 2022 Final) गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) 7 विकेटने पराभव केला. गुजरातच्या या विजयानंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) यांनी संपूर्ण टीमची भेट घेतली

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये (IPL 2022 Final) गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) 7 विकेटने पराभव केला. याचसोबत आपल्या पहिल्याच मोसमात ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही गुजरातच्या नावावर झाला. गुजरातच्या या विजयानंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) यांनी संपूर्ण टीमची भेट घेतली, यावेळी त्यांनी टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्मृतीचिन्हही भेट दिलं.

एएनआय या वृत्तसंस्थेने गुजरात टायटन्सच्या टीमच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर गुजरातची टीम अहमदाबादमध्ये रोड शो करत आहे. या रोड शोमध्ये खेळाडू त्यांच्या चाहत्यांना धन्यवाद देत आहेत. हा रोड शो उस्मानपुरा रिव्हरफ्रंटपासून सुरू होऊन विश्वकुंज रिव्हरफ्रंटला संपणार आहे.

गुजरातने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा 7 विकेटने पराभव केला. याचसोबत आपल्या कॅप्टन्सीच्या पदार्पणातच ट्रॉफी जिंकणारा हार्दिक तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी शेन वॉर्न आणि रोहित शर्माने हा रेकॉर्ड केला. गुजरातने फायनल जिंकताच आयपीएलला पाच वर्षांनी नवा चॅम्पियन मिळला.

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रन करता आले, याचा पाठलाग गुजरातने 11 बॉल शिल्क असताना 3 विकेट गमावून केला. हार्दिक पांड्याने 34 आणि शुभमन गिलने नाबाद 45 रन केले. या पराभवासोबत राजस्थानचं 14 वर्षांनी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

First published:

Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022