मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. रात्री 8 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याला सुरूवात होईल. या महामुकाबल्याची पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरही आतुरतेने वाट बघत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय व्हावा, असं मला मनापासून वाटत आहे, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) स्पोर्ट्सकीडाशी बोलताना दिली.
'शेन वॉर्नच्या (Shane Warne) आठवणीमध्ये राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकण्यासाठी आग्रही असेल, त्याच्याच नेतृत्वात राजस्थानने 2008 सालची पहिली आयपीएल जिंकली होती. 14 वर्षांनंतर त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शेन वॉर्नच्या आठवणीत राजस्थानने मैदानात उतरावं आणि गुजरातला धूळ चारावी. राजस्थानने शेन वॉर्नसाठी जिंकाव, असं मनाला वाटत आहे,' असं शोएब अख्तर म्हणाला.
'मागच्या 14 वर्षांमध्ये राजस्थानने बरेच चढ उतार पाहिले. पण मी आधीही म्हणालो होतो, नवी टीम आयपीएल जिंकावी, कारण ते चांगलं क्रिकेट खेळलं आहेत, त्यामुळे गुजरात जिंकेल,' असं वक्तव्यही शोएबने केलं.
आयपीएल फायनलसाठी दोन्ही टीम नरव्हस असतील. राजस्थानला स्वत:ला सिद्ध करायचं आहे, कारण ते 2008 नंतर पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचत आहेत. तसंच गुजरातलाही पहिल्याच मोसमात त्यांची छाप पाडायची आहे, असंही शोएब म्हणाला.
राजस्थान आणि गुजरात यांच्यात या मोसमात दोन मॅच झाल्या, या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातचा विजय झाला आहे. गुजरातने पहिले लीग स्टेजमध्ये आणि मग क्वालिफायर-1 मध्ये राजस्थानला पराभूत केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals, Shoaib akhtar